इस्राएलला आशीर्वाद द्यायची परमेशवराची इच्छा आहे हे बलामने पाहिले. म्हणून त्याने ते कुठल्याही प्रकारची जादू वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने वाळवंटाकडे पाहिले.
Cross references
दुसऱ्या दिवशी बलाम उठला आणि बालाकच्या पुढाऱ्यांना म्हणाला, “तुम्ही तुमच्या देशात परत जा. परमेश्वर मला तुमच्या बरोबर जाऊ देणार नाही.”
नंतर बलाम बालाकाला म्हणाला, “या वेदीजवळ थांब. मी दुसरीकडे जातो. नंतर परमेश्वर माझ्याकडे येईल आणि मी काय बोलायचे ते मला सांगेल.” नंतर बलाम उंच जागी गेला.
तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, “या वेदीजवळ थांब. मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो.”
परमेश्वराने मला त्या लोकांना आशीर्वाद द्यायला सांगितले, परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला. म्हणून मी ते बदलू शकत नाही.
याकोबाच्या माणसांचा पराभव करु शकेल अशी कोणतीही शक्ति नाही. इस्राएल लोकांना थोपवू शकेल अशी कोणतीही जादू नाही. लोक याकोबाबद्दल आणि इस्राएल लोकांबद्दल असे म्हणतील: ‘देवाने केलेल्या महान गोष्टी बघा.’
म्हणून बालाक बलामला घेऊन पौर पर्वताच्या माथ्यावर गेला. या पर्वतावरुन वाळवंट दिसते.
या स्त्रिया इस्राएलच्या पुरुषांसाठी वाईट आहेत. लोक परमेश्वरा पासून दूर जातील. बलामच्या वेळी झाले तसे होईल. परमेश्वराच्या लोकांना पुन्हा रोगराई येईल.
तू आता राजा होणार आहेस हे मला माहीत आहे. तू इस्राएलवर राज्य करशील.
शौल जीफच्या वाळवंटात गेला. त्याच्याबरोबर तेव्हा इस्राएलचे निवडक तीन हजाराचे सैन्य होते. दावीदचा त्या सर्वांनी जीफच्या वाळवंटात शोध घेतला.
तेव्हा दावीदला शौल म्हणाला, “देव तुझे कल्याण करो. दावीद, माझ्या मुला, तुझ्या हातून मोठी कार्ये होतील आणि तू यशस्वी होशील.”मग दावीद आपल्या मार्गाने गेला आणि शौल स्वगृही आला.
“तरीही तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: तुमच्यात असे लोक आहेत की जे बलामाची शिकवण आचरणात आणतात.बलामाने बालाकाला इस्राएल लोकांना पाप करायला कसे लावायचे ते शिकविले. त्या लोकांनी लैंगिक पापे करुन आणिमूर्तीला वाहिलेले अन्न खाऊन पाप केले.