सिप्पोराच्या मुलाने, बालाक याने इस्राएल लोकांनी अमोरी लोकांचे काय केले ते पाहिले होते. मवाबचा राजा खूप घाबरला कारण इस्राएलचे लोक खूप होते. मवाब त्यांना खरोखरच भीत होता.
Cross references
परमेश्वराने इस्राएल लोकांचे म्हणणे ऐकले आणि त्याने इस्राएल लोकांना कनानी लोकांचा पराभव करायला मदत केली. इस्राएल लोकांनी कनानी लोकांचा व त्यांच्या शहरांचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्या प्रदेशाला हर्मा असे नाव पडले.
लोक बामोथहून मवाबाच्या खोऱ्यात गेले. या जागी पिसगा पर्वताच्या उंच माथा वाळवंटाकडे जातो. (पिसगा पर्वताच्या उंच माथ्यावरुन वाळवंट दिसते)
त्यानंतर मवाबाचा राजा आणि सिप्पोरचा मुलगा बालाक याने इस्राएल लोकां विरुद्ध लढण्याची तयारी केली. त्याने बौराचा मुलगा बलाम याला बोलावणे पाठवून तुम्हाला शाप द्यायला सांगितले.
मवाबचा राजा सिप्पोर पुत्न बालाक याच्या पेक्षा तू चांगला आहेस का? तो कोठे वाद घालत बसला? तो कधी इस्राएल लोकांशी युध्द करायला सरसावला का?