हेशबोनमध्ये अमोऱ्यांचा राजा सीहोन रहात होता. पूर्वी सीहोनने मवाबच्या राजाशी युद्ध केले होते. सीहोनने आर्णोन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला होता.
Cross references
अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांना परमेश्वराने ठार मारल्यानंतरची ही गोष्ट आहे. (सीहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहात असे. ओग बाशानचा राजा होता. तो अष्टेरोथ व एद्रई येथे राहाणारा होता.)
आर्णोन खोऱ्यानजीकच्या अरोएर पासून मेदबा नगरापर्यंत, खोऱ्यामधले नगर व पठारी प्रदेश यात येतो.
तसेच हेशबोनपर्यंतची जमीन व पठारावरील सर्व नगरे या मुलखात मोडतात. ही नगरे म्हणजे दीबोन, बामोथ-बाल बेथ-बालमोन,
2याजेर आणि गिलादातील सर्व शहरे राब्बा जवळच्या अरोएरापर्यंतचा अम्मोनी लोकांचा अर्धा प्रदेशही मोशेने त्याना दिला.
हेशबोन, याजेर अशी एकंदर चार नगरे व शिवारे दिली.
तुझे मस्तक कार्मेलसारखे आहे आणि तुझ्या मस्तकावरचे तुझे केस रेशमासारखे आहेत. तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.
पुन्हा कधीही मवाबची स्तुती ऐकू येणार नाही. हेशबोनमधील लोक मवाबच्या पाडावाचा बेत आखतील ते म्हणतील, ‘या, आपण त्या देशाचा शेवट करु या.’ मदमेना, तू सुद्धा शांत होशील, तलवार तुझा पाठलाग करील.
“मवाबचा नाश होईल त्याची फजिती होईल. मवाब आक्रोश करील. मवाबचा नाश झाला असे आर्णोन नदीकाठच्या प्रदेशात जाहीर करा.
“लोक शक्तिशाली शत्रूपासून पळाले आहेत ते सुरक्षेतेसाठी हेशबोनला पळाले पण तेथे सुरक्षा नव्हती. हेशबोनमध्ये आग लागली सीहोनच्या गावात आग लागली आणि ती मवाबच्या नेत्यांचा नाश करीत आहे. ती त्या गर्विष्ठ लोकांचा नाश करीत आहे.