Cross references
लेवीय 11:32
“त्यांच्यापैकी कोणी मरुन एखाद्या वस्तूवर पडला तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; लाकडी पात्र, वस्त्र कातडे, तरट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, तो पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यत अशुद्ध समजावे; मग ते धुतल्यावर शुद्ध समजावे.
लेवीय 11:33
त्यांच्यापैकी एखादा मरुन मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.
लेवीय 14:36
“मग याजकाने लोकांना घर रिकामे करण्याची आज्ञा द्यावी; लोकांनीही घरातील सर्व वस्तू याजक, चट्ठा तपासण्यासाठी घरात जाण्याच्या अगोदर बाहेर काढाव्या नाही तर घरातील सर्व वस्तू अशुद्ध ठरावयाच्या. मग याजकाने रिकाम्या घरात जाऊन ते तपासावे.
गणना 31:20
तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. लाकूड, लोकर आणि चामडे यांपासून बनवलेल्या वस्तू धुवा. तुम्ही शुद्ध झालेच पाहिजे.”