गणना 15:26 · मराठी बायबल
इस्राएलाच्या सर्व लोकांना आणि त्यांच्यात राहणाऱ्या इतर लोकांना क्षमा केली जाईल. त्यांना क्षमा करण्यात येईल. कारण आपण चूक करीत आहोत हे त्यांना माहीत नव्हते.
Cross references
गणना 15:24
तेव्हा जर तुम्ही चूक केलीत आणि या आज्ञांचे पालन करायला विसरलात तर तुम्ही काय कराल? जर इस्राएलच्या सर्व लोकांनी मिळून चूक केली तर त्यानी सर्वांनी मिळून एक गोऱ्हा परमेश्वराला होमार्पण केला पाहिजे. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. गोऱ्ह्याबरोबर धान्यार्पण आणि पेयार्पण करायला पाहिजे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण केला पाहिजे.