मोशेने कनान देश हेरण्यास पाठविताना लोकांना सांगितले की तुम्ही येथून नेगेबमधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा.
Cross references
त्यानंतर अब्राम पुन्हा पुढच्या प्रवासास निघाला व नेगेबकडे गेला.
अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला व तो आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि त्यांची सर्व मालमत्ता घेऊन नेगेब मधून प्रवास करीत गेला.
सिद्दीम खोऱ्यात डांबराने भरलेल्या अनेक खाणी होत्या. सदोम व गमोराचे राजे सैन्यासह पळून जाताना बरेच सैनिक खाणीत पडले परंतु बाकीचे डोंगराकडे पळून गेले.
म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन वाळवंटापासून रहोब आणि लेबोहामाथपर्यंतच्या प्रदेशाचा शोध घेतला.
अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.”
दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांनी डोंगरावर असलेल्या त्या प्रदेशात जायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “आम्ही पाप केले आहे. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही याचे आम्हाला वाईट वाटते. परमेश्वराने वचन दिलेल्या प्रदेशात आम्ही जाऊ.”
तेव्हा तेथील अमोरी तुमच्याशी सामना करायला सामोरे आले. आणि चवताळलेल्या मधमाश्यांप्रमाणे त्यांनी सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हाला पिटाळून लावले.
नूनाचा मुलगा यहोशवा आणि सर्व लोक यांचा तळ शिट्टीम (अकेशिया) येथे होता. तेव्हा कोणाच्याही नकळत यहोशवारे दोन हेर पाठवले. “तुम्ही जाऊन तो देश व विशेषत: यरीहो पाहून या.” असे सांगून त्याने त्या दोन हेरांना पाठवले.त्या प्रमाणे ती माणसे यरीहोला गेली. रहाब नावाच्या एका वेश्येच्या घरी ते जाऊन राहिले.
अशाप्रकारे यहोशवाने डोंगराळ प्रदेश नेगेव. पश्चिमेकडील व पूर्वेकडील डोंगर उताराचा भाग येथील सर्व शहरांचा व राजांचा धुव्वा उडवला. इस्राएलच्या परमेश्वर देवाने यहोशवाला सर्व लोकांचा संहार करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे यहोशवाने कोणाला ही जिवंत ठेवले नाही.
ती तशीच पुढे अक्राब्बीमच्या चढणीकडून सीन वाळवंटावरुन कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस जाऊन मग हेस्रोन वरुन अद्दार पर्यंत जाते. तिथे एक वळण घेऊन ककर्ाकडे जाते.
यहूदाचे लोक पुढे डॊगराळ प्रदेशात, नेगेबमध्ये तसेच पश्चिमेकडील डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या आणखी काही कनानी लोकांवर चढाई करुन गेले.
अखसा वडीलांना म्हणाली, “मला आशीर्वाद द्या. मला तुम्ही नेगेबमधील कोरडे वाळवंट असलेली जमीन दिली आहे. तेव्हा पाणी असलेली अशी काही जमीन मला द्या.” तेव्हा कालेबने तिला हवेतसे वरच्या व खालच्या बाजूचे झरेही दिले.
या लढाईत परमेश्वर यहूद्यांच्या बाजूचा होता. त्यांनी डोंगराळ प्रदेशातील जमीन घेतली पण खोऱ्यांमधील जमीन घेण्यास ते असमर्य ठरले. कारण तेथील लोकांकडे लोखंडी रथ होते.