त्यातील दोन वडील (नेते) एलदाद व मेदाद छावणीच्या बाहेर गेले नाहीत. त्यांची नांवे वडीलांच्या (नेत्यांच्या) यादीत होती. परंतु ते छावणीतच राहिले; त्यामुळे आत्मा त्यांच्यावरही आला आणि ते छावणीतच संदेश सांगू लागले.
Cross references
परंतु मोशे देवाला म्हणाला, “मी कोणी मोठा माणूस नाही! मी साधा माणूस आहे! तेव्हा फारोकडे जाऊन इस्राएल लोकांना मिसरमधून घेऊन यावयाच्या पात्रतेचा माणूस मी नाही, तर मग मी हे कसे करु शकेन?”
परंतु मोशे म्हणाला, “माझ्या परमेश्वरा! मी तुला कळकळीची विनंती करतो की तू दुसऱ्या कोणाला पाठव. मला नको.”
त्यांनी परमेश्वराला विचारले, “शौल इथे आला आहे का?”परमेश्वर म्हणाला, “शौल कोठारामागे लपून बसला आहे.”
त्यादिवशी शौल काहीच बोलला नाही. त्याला वाटले, “काही कारणाने आज तो शुचिर्भूत नसेल.”
मग यिर्मया म्हणाला, “पण सर्वशक्तिमान परमेश्वरा, मला कसे बोलावे ते माहीत नाही. मी तर एक लहान बाआलक आहे.”
मग यिर्मया बारुखाला म्हणाला, “मी परमेश्वराच्या मंदिरात जाऊ शकत नाही. मला तेथे जाण्याची परवानगी नाही.