Home Bibles गणना 10:5 · मराठी बायबल
गणना 10:5 · मराठी बायबल

“कर्ण्यांचा थोडा गजर झाला म्हणजे लोकांनी आपला तळ हलवावा हे सांगण्याचा तो एक मार्ग होईल. पहिल्याच वेळी जेव्हा तू कर्ण्याचा थोडा गजर करशील तेव्हा दर्शनमंडपाच्या पूर्वेकडील छावण्यातील वंशानी पुढे चालण्यास सुरवात करावी.

Cross references

गणना 2:3

“यहुदावंशाच्या छावणीचे निशाण उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहुदावंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाणाजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहुदावंशाचा प्रमुख सरदार असावा.

गणना 10:6

दुसऱ्या वेळी थोडाच वेळ तू कर्णा वाजवशील तेव्हा दक्षिणेकडील छावण्यातील वंशानी पुढे निघण्यास सुरवात करावी.

गणना 10:14

यहुदाच्या छावणीतील तीन गट पहिल्याने निघाले. त्यांच्या निशाणा मागे ते चालले. पहिला गट यहुदाच्या कुळाचा होता. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन त्यांचा सेनानायक होता.

यशया 58:1

तुम्हाला शक्य असेल तेवढ्या जोरात ओरडा. थांबू नका. रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे मोठ्याने ओरडा. लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांगा. याकोबाच्या वंशजांपुढे त्यांच्या पापांचा पाढा वाचा.

योएल 2:1

सियोन वरुन रणशिंग फुंका! माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने इषारा द्या. ह्या देशात राहणाऱ्या लोकांचा भीतीने थरकाप उडू द्या. परमेश्वराचा खास दिवस येत आहे. परमेश्वराचा खास दिवस अगदी जवळ आला आहे.

Interlinear

Choose Theme