Home Bibles नहेम्या 9:35 · मराठी बायबल
नहेम्या 9:35 · मराठी बायबल

स्वत:च्या राज्यात राहात असताना देखील आमच्या पूर्वजांनी तुझी सेवा केली नाही. त्यांनी दुष्कृत्ये करायचे थांबवले नाही. तू त्यांना बहाल केलेल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टींचा त्यांनी उपभोग घेतला. सुपीक जमीन आणि विशाल प्रदेश याचा त्यांनी उपभोग घेतला. पण तरीही स्वत:च्या वाईट कृत्यांना त्यांनी आळा घातला नाही.

Cross references

अनुवाद 8:7

तुमचा देव परमेश्वर तुम्हाला उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्यानाले आहेत.

अनुवाद 28:47

“सर्व तऱ्हेची समृद्धी असताना तुम्ही आनंदाने व उत्साहित मनाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही म्हणून

अनुवाद 28:48

परमेश्वराने पाठविलेल्या शत्रूसमोर तुम्हाला नतमस्तक व्हावे लागेल. तुम्ही तहान भूकेने गांजलेले दीन, सर्व तऱ्हेने वंचित असे व्हाल. परमेश्वर तुमच्या मानेवर जोखंड ठेवील. ते तुम्हाला बाजूला करता येणार नाही. तुमच्या अंतापर्यंत ते तुम्हांला वागवावे लागेल.

अनुवाद 31:21

त्यामुळे त्यांच्यावर आपत्ती कोसळतील. त्यांना अनेक अडचणी येतील. त्याही वेळी हे गीत त्यांच्यामुखी असेल आणि त्यांच्या चुकीची साक्ष त्यांना पटेल. मी त्यांना त्या भूमीत अजून नेलेले नाही. पण त्यांच्या मनात तेथे गेल्यावर काय काय करायचे या बद्दल जे विचार चालू आहेत ते मला अगोदरच माहीत आहेत.”

अनुवाद 32:12

“परमेश्वरानेच इस्राएलला पुढे आणले. दुसरा कोणी देव मदतीला नव्हता.

नहेम्या 9:25

त्यांनी मजबूत नगरांचा कब्जा घेतला. सुपीक प्रदेश त्यांनी मिळवला, उत्तम वस्तूनी भरलेली घरे त्यांना मिळाली खोदलेल्या विहिरी त्यांना आयत्या मिळाल्या. द्राक्षमळे, जैतूनाची झाडे आणि पुष्कळशी फळझाडे त्यांना मिळाली, खाऊन पिऊन ते तृप्त झाले, पुष्ट झाले. तू त्यांना दिलेल्या मनोहारी गोष्टीचा त्यांनी उपभोग घेतला.

यिर्मया 5:19

यहूदाचे लोक तुला विचारतील, ‘यिर्मया, आमच्या परमेश्वर देवाने आमचे असे वाईट का केले?’ त्यांना पुढील उत्तर दे, ‘यहूदाच्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराला सोडले आणि तुमच्या देशात तुम्ही परक्या मूर्तींची सेवा केली. तुम्ही असे वागलात म्हणून आता तुम्ही परक्या देशात परक्यांचीच सेवा कराल.”

यहेज्केल 5:6

यरुशलेमच्या लोकांनी माझ्या नियमांविरुद्ध बंड केले. दुसऱ्या कोठल्याही राष्ट्रांपेक्षा ते वाईट आहेत. त्यांच्या भोवती असलेल्या देशांतील लोकांपेक्षा त्यांनी माझे नियम जास्त मोडले. त्यांनी माझ्या आज्ञा मानायचे नाकारले. त्यांनी माझे नियम पाळले नाहीत.”

रोमकरांस 3:4

खात्रीने नाही! देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत असता तू विजय मिळविशील.”

Interlinear

Choose Theme