परमेश्वराने मोशेमार्फत लोकांना हे नियमशास्त्र दिले. त्यात यांना अभ्यासातून असे सापडले की, वर्षाच्या सातव्या महिन्यात इस्राएल लोकांनी तात्पुरत्या राहूट्यांत राहावे. लोकांनी सर्व नगरांमध्ये आणि यरुशलेमभर फिरुन अशी घोषणा करावी, “डोंगराळ भागामध्ये जाऊन वेगवेगळया प्रकारच्या जैतून वृक्षांच्या फांद्या आणाव्या. देवदारू, खजुरी आणि सावली देणाऱ्या वृक्षांच्या फांद्या आणाव्या आणि त्यांची तात्पुरते मांडव उभारावेत. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करावे.”
Cross references
याकोब गांवास गेला; तेथे त्याने स्वत:साठी घर बांधले आणि गुरांढोरांसाठी खोपट्या बांधल्या म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ पडले.
“इस्राएल लोकांना सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा;
पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळूंज ही घेऊन परमेश्वरासमोर सात दिवस उत्सव करावा.
“खळयातील आणि द्राक्षकुंडांमधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसांनी मंडपाचा सण साजरा करा.
यरुशलेमशी लढण्यास आलेल्यापैकी काही वाचतील. आणि सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यासाठी ते दरवर्षी येतील. मंडपाचा सण साजरा करायला ते यरुशलेमला येतील.
यहूदी लोकांचा मंडपाचा सणजवळ आला होता.