आणखी काही म्हणत, “आमची शेते आणि द्राक्षमळे यांच्यावर आम्हाला राजाचा कर लागत आहे. पण तो भरणे परवडत नसल्यामुळे आम्हाला पैसे उसने घ्यावे लागत आहेत.
Cross references
“सर्व तऱ्हेची समृद्धी असताना तुम्ही आनंदाने व उत्साहित मनाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही म्हणून
तथापी, गेजेर मध्ये राहणाऱ्या कनानी लोकांना ते घालवू शकले नाहीत. तेव्हा कनानी लोक अजूनही एफ्राईम लोकांमध्येच राहतात. व ते एफ्राईम लोकांचे दास झाले.
इस्राएल लोकांना त्यांचा पाडाव करता आलेला नव्हता. पण शलमोनाने त्यांना आपले गुलाम केले. आजही त्यांची स्थिती तशीच आहे.
राजा अर्तहशश्त, यरुशलेमभोवतीचा हा कोट पुरा झाला की हे लोक तुमच्या सन्मानार्थ कर, जकात वगैरे भरणे थांबवतील व त्यामुळे तुमचा मोठा तोटा होईल हे तुमच्या ध्यानी यावे.
यरुशलेम आणि फरात नदीच्या पश्रिम प्रदेशावर राज्य करणारे पराक्रमी राजे होऊन गेले. त्या राजांना लोक कर, जकात व खंडणी देत असत.
एज्रा, मंदिरातील याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरातील सेवेकरी, किंवा मंदिरातील कामाशी संबंधित इतर कोणी यांना कर द्यायला लावणे नियमाविरुध्द आहे. हे तुम्ही लोकांनी समजून घ्यावे अशी माझी इच्छी आहे. त्यांनी कोणताही कर, खंडणी, जकात भरायची नाही.
या जमिनीत मुबलक पीक येते पण आम्ही पाप केले, त्यामुळे तू आमच्यावर नेमलेल्या राजांच्या पदरीच हे पीक जाते. या राजांचे आमच्यावर आणि आमच्या गुराढोरांवर नियंत्रण आहे. ते मन मानेल तसे वागतात. आम्ही मोठ्या संकटात आहोत.
गरीब लोक श्रीमंतांचे गुलाम असतात. जो माणूस कर्ज घेतो तो जो कर्ज देतो त्याचा गुलाम असतो.