यावर ते श्रीमंत लोक आणि अधिकारी म्हणाले, “आम्ही ते परत करु आणि आम्ही त्यांच्या कडून आधिक काही मागणार नाही. नहेम्या, आम्ही तुझ्या म्हणण्याबरहुकूम वागू.”मग मी याजकांना बोलावून घेतले. श्रीमंत लोक आणि अधिकारी जे बोलले त्याप्रमाणे वागण्याचे मी त्यांना देवासमोर वचन द्यायला लावले.
Cross references
मग राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्याच्या मागोमाग यहूदा आणि यरुशलेम येथे राहणारे लोकही गेले. अगदी सामान्य माणसापासून याजक, संदेष्टे यांच्यासारख्या महत्वाच्या वयक्तीपर्यंत झाडून सर्वजण राजाच्या बरोबर गेले. मग राजाने परमेश्वराच्या मंदिरात सापडलेले कराराचे पुस्तक काढून त्यातील सर्व वचने सगळ्यांना ऐकू जातील अशी वाचली.
“एखाद्याने दुसऱ्याची काही आगळीक केल्याचा आरोप त्याच्यावर आला आणि तो तुझे नाव घेऊन आपण निर्दोष आहोत असे सांगू लागला तर तो वेदीसमोर तसे शपथ घेऊन सांगत असताना,
जो परमेश्वर देवाची सेवा करणार नाही त्याला ठार करण्याचे ठरवले. मग अशी व्यक्ती लहान असो की मोठी, स्त्री असो की पुरुष
तेव्हा त्या सैनिकांनी कैदी आणि लुटलेली चीजवस्तू हे इस्राएल लोकांच्या आणि त्या प्रमुखांच्या हवाली केले.
तेव्हा एज्रा उठला, प्रमुख यजाक, लेवी आणि सर्व इस्राएली लोक यांच्याकडून त्याने आपल्या म्हणण्यानुसार वागण्याची शपथ घेतली.
यावर त्या जमावाने एज्राला खणखणीत आवाजात उत्तर दिले की, “एज्रा, तू म्हणतोस ते खरे आहे. तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्हाला वागले पाहिजे.
“आमच्या भोवतींच्या प्रदेशातील लोकांमध्ये आम्ही आमच्या मुलींची लग्ने होऊ देणार नाही तसेच त्यांच्या मुली आमच्या मुलांसाठी करून घेणार नाही असे आम्ही वचन देतो.
“शब्बाथ दिवशी आम्ही काम करणार नाही. शब्बाथ दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पवित्र दिवशी आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांनी धान्य किंवा इतर काही वस्तू विकायला आणल्या तर त्यांची खरेदी आम्ही करणार नाही. दर सातव्या वर्षी आम्ही जमीन पडीक ठेवू. तिची मशागत करणार नाही. तसेच त्या वर्षी सर्व देणेकऱ्यांना आम्ही ऋणातून मुक्त करु.
तेव्हा मी त्या पुरुषांना त्यांचा हा दोष दाखवला. त्यांचा मी धिक्कार केला. काहींना मारहाण करून त्यांचे केस उपटले. त्यांना देवाची शपथ घ्यायला लावली. त्यांना मी म्हणालो, “त्या लोकांच्या मुलींशी लग्ने करु नका. तुमच्या मुलांशी या परक्या लोकांच्या मुलींची लग्ने होऊ देऊ नका. तुमच्या मुलींना त्या परक्या लोकांच्या मुलांशी लग्ने करु देऊ नका.
सर्व इब्री गुलांमांना स्वातंत्र्य देण्याचा करार सिद्कीया राजाने यरुशलेमच्या सर्व लोकांबरोबर केला होता. हा करार झाल्यावर यिर्मयाला देवाचा संदेश आला.
येशूने उत्तर दिले, तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक. आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठा ठेवा मळेल. मग ये आणि माझ्यामागे चालू लाग.”
पण येशूने काहीच उत्तर दिले नाही. परत एकदा प्रमुख याजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय?”
परंतु जक्कय उभा राहिला व प्रभूला म्हणाला, “गुरुजी, जे माझे आहे त्यातील अर्धे मी गरिबांना दिले असे समजा व मी कोणाला फसवून काही घेतले असेल तर ते चौपट परत करीन.”