Home Bibles नहेम्या 4:20 · मराठी बायबल
नहेम्या 4:20 · मराठी बायबल

तेव्हा कर्ण्याचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी धावत या. तेथे आपण एकत्रगोळा होऊ आणि देवच आपल्यासाठी लढेल.”

Cross references

निर्गम 14:14

शांत राहण्यावाचून तुम्हाला काहीच करावे लागणार नाही. परमेश्वर तुमच्याकरिता त्यांच्याशी लढेल.”

निर्गम 14:25

रथांची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसरच्या लोकांना कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलच्या बाजूने आम्हाविरुद्ध लढत आहे.”

अनुवाद 1:30

स्वत: परमेश्वर देव तुमचा पाठिराखा आहे. मिसर देशात तुमच्यादेखत त्याने जे केले तेच तो येथेही करील. तुमच्यासाठी लढेल.

अनुवाद 3:22

तेथील राजांना घाबरु नका. कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे.’

अनुवाद 20:4

कारण तुम्हाला देव परमेश्वर ह्याची साथ आहे. शत्रू विरुद्ध लढाई करायला तसेच विजय मिळवायला तो तुम्हाला मदत करणारा आहे.’

यहोशवा 23:10

परमेश्वराच्या साहाय्याने, एक इस्राएल माणूस शत्रूच्या हजार सैनिकांना सळो की पळो करु शकतो. कारण खुद्द तुमचा परमेश्वर देवच तुमच्या वतीने लढतो. असे करायचा परमेश्राने शब्द दिला आहे.

1 इतिहास 19:12

यवाब अबीशयला म्हणाला,’ अरामचे सैन्य जर मला भारी ठरले तर तू माझ्या मदतीला ये. आणि अम्मोनी तुझ्यापेक्षा प्रबळ ठरले तर मी तुला सहाय्य करीन.

जखऱ्या 14:3

मग परमेश्वर त्या राष्ट्रांविरुध्द युध्द पुकारेल ते खरोखरीचे युध्द असेल.

Interlinear

Choose Theme