हानून नावाचा एक जण आणि जानोहे येथे राहाणारे लोक यांनी खोऱ्याच्या वेशीची दुरुस्ती केली. ही वेस बांधून त्यांनी दारे बिजागाऱ्यांवर उभी केली. मग या दारांना त्यांनी कड्या व अडसर घातले. शिवाय त्यांनी पाचशे याई लांबीची भिंतही दुरुस्त केली. थेट उकिरड्याच्या वेशीपर्यंत त्यांनी ही डागडुजी केली.
Cross references
जानोह, एन-गन्रीम, तप्पूहा, एनाम,
इज्रेल, यकदाम, जानोह,
यरुशलेममध्ये कोपऱ्यातली वेस, खोऱ्याची वेस आणि कोट वळसा घेतो तेथे उज्जीयाने बुरुज बांधून तटबांदीला बळकटी आणली.
अंधार असतानाच राखोच्या ढिगाची वेस यांच्या दिशेने मी कूच केले. यरुशलेमची मोडलेली तटबंदीची भिंत आणि त्यातील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली प्रवेशद्वरे यांची पाहाणी केली.
तेव्हा मी अंधारातच भिंतीची बारकाईने तपासणी करत खोऱ्यातून वेशीतून आत शिरलो.
जानोहा, अदुल्लम ही नगरे आणि त्यांच्या आसपासची गावे, लाखीश आणि त्याच्या भोवतालची शेतीवाडी, अजेका आणि त्याभोवतीची खेडी. अशाप्रकारे यहुदाचे लोक बैरशेबापासून हिन्नोमच्या खोऱ्यापर्यंतच्या भागात राहात होते.