मग मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर हे याजक मंदिरात आपापल्या जागी उभे राहिले.मग यिज्र ह्याच्या अधिपत्याखाली या दोन्ही गायक गटांनी गायनाला सुरुवात केली.
Cross references
माज्या, बिल्गई, आणि शमया. ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याजकांची नावे झाली.
आणि इम्मेरचे 128भाऊबंद (हे सर्व शूर सैनिक होते. हगदोलीमचा पुत्र जब्दीएल त्यांचा अधिकारी होता.)
आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा, इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
संगीताची सुरुवात करा. डफ वाजवा. सतार आणि वीणा वाजवा.
चला, परमेश्वराची स्तुती करु या. जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या.
त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला. दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.
हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा कारण त्याने महान कार्य केले आहे. देवबाद्दल ही वार्ता सर्व जगात पसरवा सर्व लोकांना हे कळू द्या.