Cross references
नहेम्या 3:4
उरीयाचा मुलगा मेरेमोथ याने या तटबंदीच्या पुढच्या भागाची डागडूजी केली. (उरीया हा हक्कोस याचा मुलगा.)बरेख्याचा मुलगा मशुल्लाम याने त्याच्या पुढच्या भागाचे काम केले. (बरेख्या मशेजबेलचा मुलगा.)बावाचा मुलगा सादोक याने त्यापुढील भागाची दुरुस्ती केली.
नहेम्या 3:10
हरूमफाचा मुलगा यदाया याने भिंतीच्या पुढच्या भागाचे काम केले. आपल्या स्वत:च्या घरालगतच्या भिंतीची डागडूजी त्याने केली. त्याच्या पुढचा भाग हशबन्याचा मुलगा हत्तूश याने बांधला.
नहेम्या 3:11
हारीमचा मुलगा मल्कीया आणि पहथ-मवाबचा मुलगा हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली. तसेच भट्टी बुरुज ही बांधला.
नहेम्या 3:21
हक्कोसचा मुलगा उरीया. उरीयाचा मुलगा मेरेमोथ याने एल्याशीबच्या घराच्या दारपासून थेट घराच्या शेवटपर्यंत भिंतीचे काम केले.
नहेम्या 12:3
शखन्या, रहूम मरेमोथ,