Home Bibles नहेम्या 10:33 · मराठी बायबल
नहेम्या 10:33 · मराठी बायबल

मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या धान्यार्पणाची समर्पित भाकर, रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण, शब्बाथ, नवचंद्रदिनी आणि नैमित्तिक सण यादिवशी करायची अर्पणे, इस्राएलींच्या शुध्दीकरणासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे, देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च हे सर्व खर्च या पैशातून भागतील.

Cross references

निर्गम 30:16

हा पैसा इस्राएल लोकांकडून गोळा करावा आणि त्याचा दर्शनमंडपातील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा म्हणजे परमेश्वराला आपल्या लोकांची आठवण राहण्याचा एक मार्ग होईल; लोक आपल्या जिवाबद्दल खंडणी देत राहतील.”

लेवीय 24:5

तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोव्व्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर मैद्याचा करावा.

गणना 28:1

नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,

2 इतिहास 2:4

मी माझ्या परमेश्वर देवाच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधणार आहे. तेथे आम्ही रोज परमेश्वरासमोर सुगंधी धूप जाळू तसेच एका खास मेजावर पवित्र भाकर ठेवू. शिवाय, रोज सकाळ संध्याकाळ, शब्बाथच्या दिवशी, दर नव चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वराने नेमून दिलेल्या सहभोजनाच्या दिवशी आम्ही होमार्पणे वाहू. इस्राएल लोकांनी सर्वकाळ पाळायचा हा नियमच आहे.

2 इतिहास 24:5

तेव्हा त्याने याजक आणि लेवी यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “यहूदामधील सर्व गावांमध्ये जा आणि इस्राएल लोकांकडून वार्षिक कर गोळा करा. त्या पैशातून देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घ्या. या कामाला विलंब लावू नका.” पण लेवीनी याबाबतीत तप्तरता दाखवली नाही.

इब्री लोकांस 10:11

प्रत्येक यहूदी याजक उभा राहतो आणि दररोज त्याची धार्मिक कामे करत असतो आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो.

Interlinear

Choose Theme