Home Bibles नहूम 2:1 · मराठी बायबल
नहूम 2:1 · मराठी बायबल

तुझ्यावर हल्ला करण्यासाठी शत्रू येत आहे तेव्हा तुझ्या शहरातील भक्कम जागांचे रक्षण कर रस्त्यांवर नजर ठेव युध्दाला सज्ज हो! लढाईची तयारी कर!

Cross references

2 इतिहास 25:8

तू भले कितीही तयारी करुन लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे.”

स्तोत्रसंहिता 50:14

म्हणून तुमचे कृतज्ञता उपहार आणा आणि देवाबरोबर असण्यासाठी या तुम्ही सर्वशक्तिमान देवाला वचने दिली. तेव्हा आता कबूल केलेल्या वस्तू त्याला द्या.

स्तोत्रसंहिता 65:2

तू केलेल्या गोष्टींबद्दल आम्ही लोकांना सांगतो. आणि तू आमची प्रार्थना ऐकतोस. तू तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची प्रार्थना ऐकतोस.

यशया 14:6

रागाच्या भरात बाबेलोनच्या राजाने लोकांना फटकावले. तो नेहमीच लोकांना फटकावत असे. त्या दुष्ट राजाने क्रोधाने लोकांवर सत्ता गाजवली. तो नेहमीच लोकांना दुखवत असे.

यशया 29:7

अनेक राष्ट्रे अरीएलविरूध्द लढली. ते सर्व रात्रीच्या दु:स्वप्नासारखे होते. सैन्यांनी अरीएलला वेढा घातला आणि शिक्षा केली.

यशया 29:8

पण त्या सैन्यांनाही ते स्वप्नासारखेच वाटेल. त्यांना पाहिजे असलेले मिळणार नाही. उपाशी माणसाला अन्नाबद्दलचे स्वप्न पाहावे तसेच ते असेल. तो जागा झाला तरी त्याची तहान भागलेली नसते.सियोनविरूध्द लढणाऱ्या राष्ट्रांची अशीच स्थिती आहे. त्या राष्ट्रांना जे हवे आहे ते मिळणार नाही.

यशया 52:7

“शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी घोषणा देवदूताकडून ऐकणे असे शुभवर्तमान घेऊन टेकड्यांवरून येणारा देवदूताचा आवाज ऐकणे ही खरोखरच विस्मयकारक गोष्ट आहे.

यिर्मया 25:9

म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना बोलावून घेईन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी लवकरच बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याला निरोप पाठवीन. तो माझा सेवक आहे. मी त्यांना यहूदा व यहूदातील लोक यांच्याविरुध्द उठवीन. तुमच्या देशाभोवतालच्या राष्ट्रांच्यासुद्धा विरोधात मी त्यांना आणीन. मी त्या सर्व देशांचा नाश करीन. मी त्या भूमीचे कायमचे ओसाड वाळवंट बनवीन. लोक ते देश व त्याचा वाईट प्रकारे झालेला नाश पाहतील व हळहळतील.

यिर्मया 46:3

“तुमच्या लहान मोठ्या ढाली तयार ठेवा. लढण्यासाठी कूच करा

यिर्मया 50:23

बाबेलला ‘सर्व जगाचा हातोडा’ असे म्हटले गेले. पण आता ‘हातोड्याचे तुकडे तुकडे झाले आहेत इतर राष्ट्रापेक्षा बाबेलचा सर्वाधिक नाश झाला आहे.

यिर्मया 51:11

बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराला मेद्यांच्या राजाकडून बाबेल नष्ट करायचे होते, म्हणून त्याने त्यांना स्फूर्ती दिली. बाबेलच्या लोकांना योग्य अशी शिक्षा परमेश्वर करील. बाबेलच्या सैन्याने यरुशलेममधील परमेश्वराचे मंदिर उध्वस्त केले. त्याबद्दल परमेश्वर त्यांना यथायोग्य शिक्षा करील.

यिर्मया 51:20

परमेश्वर म्हणतो, “बाबेल, तू माझा दंडुका आहेस. तुझा उपयोग मी राष्ट्रांची शकले व राज्यांचा नाश करण्यासाठी केला.

योएल 3:9

राष्ट्रा-राष्ट्रामध्ये घोषणा करा: युध्दाला सज्ज व्हा. बलवान माणसांना उठवा. सर्व योध्दे जवळ येऊ देत त्यांना उठू द्या.

नहूम 3:14

पाणी आणून साठवून ठेव. का? कारण शत्रुसैन्य शहराला घेराव घालणार आहे. ते कोणालाही अन्न-पाणी आत नेऊ देणार नाहीत. तुझ्या बचावाच्या जागा भक्कम कर. विटा तयार करण्यासाठी माती मिळव. चुना कालब! विटा बनविण्याचे साचे मिळव!

Interlinear

Choose Theme