तुम्ही खाल, पण तृप्त होणार नाही. तुम्ही भुकेले आणि रिते राहाललोकांना सुरक्षितेत आणण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. पण तुम्ही ज्यांना सोडविले त्यांना तलवारधारी लोक जीवे मारतील.
Cross references
मी तुम्हाला धान्याचा फार थोडा वाटा देईन; तेव्हा दहा स्त्रीया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हाला तोलून देतील; ती तुम्ही खाल तुमचे पोट भरणार नाही-तुम्ही भुकेलेच राहाल!
माझा क्रोध धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे. अधोलोकाच्या तळापर्यंत तो जाळत जातो. पृथ्वी व तिच्यावरील वनस्पती, पर्वतांचे पायथे यांनाही तो भस्मसात करतो.
रस्त्यावर सैन्य त्यांना मारेल व घरात ते भयभीत होतील. तरुण पुरुष, स्त्रिया, लहानमुले व वृद्ध सर्वांना सैन्य ठार करेल.
त्या वेळी एखादा उठेल व आपल्या घरातील एकाद्या भावाला पकडेल व त्याला म्हणेल “तुझ्याजवळ अंगरखा आहे, तर मग ह्या विध्वंस झालेल्या अवशेषांवर तूच नेता होशील.”
माणसे उजवीकडचे काही तरी पकडून खायला बघतील, पण त्यांची भूक भागणार नाही. मग ते डावीकडचे काही तरी खातील पण त्यांची भूक तरीही भागणार नाही. मग प्रत्येक जण वळेल आणि स्वत:चेच शरीर खाईल.
ह्या देशात राहणाऱ्या लोकांवर येणारे संकट मला दिसत आहे. त्यांची भीती, त्यांच्या पुढे असलेले खाचखळगे व सापळे मला दिसतात.
नेगेवमधल्या प्राण्यांविषयी शोक संदेश:नेगेव ही धोकादायक जागा आहे. ही भूमी सिंह, फुरसे व उडणारे साप ह्यांनी व्यापलेली आहे. पण काही लोक नेगेवमधूनच प्रवास करीत आहेत. ते मिसरला जात आहेत. त्यांनी आपली धन संपत्ती गाढवांवर व उटांवर लादली आहे. ह्याचा अर्थ त्यांना मदत न करू शकणाऱ्या राष्ट्रांवर ते विसंबले आहेत.
तेव्हा, परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला, “माझ्या सेवकांना खायला मिळेल, पण तुम्ही पापी भुकेले राहाल. माझ्या सेवकांना पाणी मिळेल, पण तुम्ही तहानलेले राहाल. माझे सेवक सुखी होतील, पण तुम्ही लज्जित व्हाल.
लोक घाबरुन पळतील ते गर्तेत पडतील एखादा त्यातून वर आलाच, तर तो सापळ्यात सापडेल मी मवाबवर शिक्षेचे वर्ष आणीन.” परमेश्वराने असे सांगितले.
पुढे देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, यरुशलेमच्या धान्य पुरवठ्याचा मी नाश करीत आहे. लोकांना खायला अगदी थोडी भाकरी मिळेल. धान्य पुरवठ्याबाबत त्यांना अत्यंत चिंता पडेल. त्यांना पिण्यालाही अगदी कमी पाणी मिळेल. ते पाणी पिताना घाबरतील.
तुमचे एक तृतीयांश लोक रोगराईने व उपासमारीने नगरातच मरतील. एक तृतीयांश नगराबाहरे लढाईत मरतील. आणि उरलेल्या एक तृतीयांश लोकांचा माझी तलवार, दूरवरच्या देशांपर्यंत पाठलाग करील. तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांना लढाईत ठार करतील. मगच माझा राग शांत होईल.
ते खातील, पण त्यांची तृप्ती होणार नाही. ते व्यभिचाराचे पाप करतील, पण त्यांना मुले होणार नाहीत. का? कारण त्यांनी परमेश्वराचा त्याग केला आणि वेश्येप्रमाणे वर्तन केले.
कोणीही पळून जाऊ शकणार नाही. अगदी जोरात धावणारा सुध्दा! बलवान पुरेसे बलवान राहणार नाहीत. सैनिक पळून जाऊन स्वत:ला वाचवू शकणार नाहीत.
मी प्रभूला वेदीजवळ उभे असल्याचे पाहिले तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यावर मार मग इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. खांब लोकांच्या डोक्यावर पाड. कोणी जिवंत राहिल्यास, मी त्याला तलवारीने ठार मारीन. एखादा पळून जाईल, पण सुटणार नाही. लोकांपैकी एकही सुटून पळू शकणार नाही.
तुम्ही खूप पेरले पण तुमच्या हाती थोडेच पीक लागले. तुम्हाला खायला मिळते खरे, पण पोटभर नाही. थोडेफार पिण्यास मिळते, पण धुंदी चढण्याईतके नाही. काही ल्यायला आहे, पण ऊब आणण्याईतके नाही. तुम्ही थोडा पैसा कमविता, पण तो कोठे जातो तेच कळत नाही. जणू काही तुमच्या खिशाला छिद्र पडले आहे.”
लोकांना वीस मापे धान्य पाहिजे असताना, राशीत दहा मापेच होते मद्यकुंडातून लोकांना पन्नास बुधले मद्य पाहिजे होते पर त्याच्यात फक्त वीसच बुधले मद्य होते.