Home Bibles मत्तय 9:8 · मराठी बायबल
मत्तय 9:8 · मराठी बायबल

लोकांनी हे पाहिले व ते थक्क झाले आणि ज्या देवाने मनुष्यास असा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.

Cross references

मत्तय 5:16

“तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.

मत्तय 12:23

सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, ‘हा दाविदाचा पुत्र असेल काय?’

मत्तय 15:31

मुके बोलू लागले, लुळे सशक्त झाले. व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले, आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचा गौरव केले.

मत्तय 28:18

तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, ʇस्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.

मार्क 2:12

मग तो लगेच उठला. त्याने आपला बिछाना घेतला व सर्वाच्या समक्ष बाहेर गेला. यामुळे ते सर्व थक्क झाले. त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “यासारखे आम्ही कधी पाहिले नव्हते.”

मार्क 7:37

ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्व काही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”

लूक 5:25

ताबडतोब तो उभा राहिला, ज्या बिछान्यावर तो झोपला होता तो त्याने उचलला व देवाची स्तुति करीत आपल्या घरी गेला.

लूक 7:16

ते सर्व भयचकित झाले, त्यांनी देवाचे गौरव केले; ते म्हणाले, “आमच्यामध्ये एक महान संदेष्टा प्रगट झाला आहे.” आणि म्हणाले, “देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे!”

लूक 13:13

नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ सरळ झाली. आणि ती देवाची स्तुति करु लागली.

लूक 17:15

जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की, आपण बरे झालो आहोत, तेव्हा तो परत आला व त्याने मोठ्या स्वरात देवाची स्तुति केली.

लूक 23:47

जेव्हा रोमी सेवाधिकाऱ्याने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”

योहान 15:8

तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते, आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.

प्रेषितांचीं कृत्यें 4:21

प्रेषितांना शिक्षा करण्याचा मार्ग त्यांना सापडेना; कारण जे काही घडले होते त्याविषयी लोक देवाची स्तुति करीत होते. (हा चमत्कार देवाकडून घडला होता. शिवाय जो बरा झाला होता, तो चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता.) म्हणून यहूदी पुढाऱ्यांनी प्रेषितांना पुन्हा ताकीद दिली व त्यांना सोडून दिले.

प्रेषितांचीं कृत्यें 11:18

जेव्हा यहूदी विश्वासणाऱ्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा त्यांनी आपले म्हणणे थांबविले, त्यांनी देवाची स्तति केली आणि म्हणाले. “म्हणजे देव यहूदी नसलेल्यांना त्यांचे अंत;करण बदलण्यासाठी मोकळीक देत आहे आणि आम्हांला जसे जीवन प्राप्त झाले तसे त्यांनाही देऊ इच्छीत आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 21:20

जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला. आणि ते त्याला म्हणाले, “बंधु, तू पाहशील की हजारो यहूदी विश्वासणारे झालेत. पण त्यांना असे वाटते की, मोशेचे नियम पाळणे फार महत्वाचे आहे.

गलतीकरांस 1:24

आणि माझ्यामुळे त्यांनी देवाचे गौरव केले.

Interlinear

Choose Theme