Home Bibles मत्तय 9:16 · मराठी बायबल
मत्तय 9:16 · मराठी बायबल

कोणी नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला लावीत नाही, कारण ते ठिगळ त्या कापडापासून निघून जाईल व छिद्र अधिक मोठे होईल.

Cross references

उत्पत्ति 33:14

तर माझे स्वामी आपण पुढे निघा; मी माझी गायीगुरे, शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांना जितके चालवेल आणि माझी लहानमुलेही थकणार नाहीत अशा चालीने चालेन व आपणास सेईर येथे येऊन भेटेन.”

स्तोत्रसंहिता 125:3

दुष्ट लोक चांगल्या माणसांच्या जमिनीवर कधीही ताबा मिळवू शकणार नाहीत. जर तसे घडले तर चांगले लोकही वाईट वागायला लागतील.

यशया 40:11

ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढ्या वळवतो त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या लोकांना वळवेल. परमेश्वर आपल्या हाताने (सामर्थ्याने) त्यांना एकत्र गोळा करील. तो लहान मेढ्यांना हातांत उचलून घेईल व त्या लहानग्यांच्या आया परमेश्वराच्या बाजूबाजूने चालतील.

लूक 5:36

त्याने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली, “कोणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावीत नाही, जर तो तसे करतो तर तो नवे कापड फाडतो पण नव्या कापडांचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसणार नाही.

योहान 16:12

“मला आणखी पुष्कळ सांगावयाचे आहे. तुम्हांला झेपणार नाही इतके सांगायचे आहे.

1 करिंथकरांस 3:1

परंतु बंधूंनो आध्यात्मिक लोक म्हणून मी तुमच्याशी बोलू शकत नव्हतो. त्याऐवजी मला तुमच्याशी देहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकासारखे बोलावे लागले.

1 करिंथकरांस 13:13

सारांश, या तीन गोष्टी राहतात : विश्वास, आशा आणि प्रीति पण यातील सर्वांत महान प्रीति आहे.

Interlinear

Choose Theme