Home Bibles मत्तय 6:7 · मराठी बायबल
मत्तय 6:7 · मराठी बायबल

“आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ज्यांना देव माहीत नाही अशासारखे होऊ नका. ते निरर्थक बडबड करतात. कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते.

Cross references

1 राजे 8:26

परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, हा माझ्या वडीलांना दिलेला शब्दही खरा ठरु दे अशी माझी प्रार्थना आहे.

1 राजे 18:26

तेव्हा त्या संदेष्ट्यांनी एक गोऱ्हा घेतला आणि ते तयारीला लागले. दुपारपर्यंत त्यांनी बालची प्रार्थना केली. “बाल आमच्या हाकेला ओ दे” अशी त्यांनी विनवणी केली. पण कसलाही आवाज आला नाही किंवा उत्तर दिले नाही. आपण रचलेल्या वेदीभोवती ते संदेष्टे नाचले तरी अग्नी काही प्रज्वलित झाला नाही.

उपदेशक 5:2

देवाला वचन देताना तुम्ही काळजी घ्या. देवाशी बोलताना काळजी घ्या. भावनाशील होऊन लगेच बोलायला सुरुवात करू नका. देव स्वर्गात असतो आणि तुम्ही पुथ्वीवर. म्हणून देवाला फक्त काही मोजक्या गोष्टीच सांगायची आवश्यकता असते. ही म्हण खरी आहे:

उपदेशक 5:7

तुमची निरर्थक स्वप्रे आणि पोकळ बडबड तुम्हाला संकटात लोटणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही देवाला मान द्यायला हवा.

दानीएल 9:18

माझ्या देवा, माझा धावा, ऐक. डोळे उघडून आमच्यावर आलेली भयानक संकटे पाहा. तुझ्या नावाने प्रसिध्द असलेल्या नगरीची काय अवस्था झाली आहे ती पाहा.”आम्ही चांगले आहोत” असे मी म्हणत नाही. त्याकरिता मी ह्या गोष्टी मागत नाही, तर तू दयाळू आहेस हे मला ठाऊक आहे म्हणून मी तुझ्याकडे ह्या गोष्टी मागत आहे.

मत्तय 6:32

सर्व लोक ज्यांना देव माहीत नाही, ते सुध्दा या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात, काळजी करू नका. कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हांला या गोष्टींची गरज आहे हे माहीत आहे.

मत्तय 18:17

जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीसमोर ही गोष्ट मांड. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकाणार नाही, तर मग तो देवाचा नाही, असे समज किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.

मत्तय 26:39

तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दु:खाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”

मत्तय 26:42

नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दु:खाचा हा प्याला पिणे मला अटळच आहे तर तुझी इच्छा असेल तसे होवो.”

मत्तय 26:44

नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि त्याने प्रार्थना केली. तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा हेच शब्द उच्चारले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:34

पण जेव्हा लोकांना समजले की, तो एक यहूदी आहे, तेव्हा जवळ जवळ दोन तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, “इफिसकरंची अर्तमी देवी थोर आहे!”

Interlinear

Choose Theme