Cross references
परमेश्वर म्हणतो, “आपल्याला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढे प्रत्येक जणाने घ्यावे; तुम्हापैकी प्रत्येकाने तुमच्या कुटूंबातील लोकांकरिता दर माणशी आठवाट्या म्हणजे एक ओमर गोळा करावे.”‘
मी त्याच्या आज्ञेचे पालन केले. मी माझ्या अन्नापेक्षा देवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर अधिक प्रेम करतो.
परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो. जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो.
शक्तिशाली माणसे दुबळी आणि भुकेली बनतील. परंतु जे लोक देवाकडे मदतीसाठी जातात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतील.
खोटे न बोलण्यासाठी मला मदत कर आणि मला खूप श्रीमंत वा खूप गरीब करु नकोस. मला रोज लागणाऱ्या गोष्टीच फक्त दे.
ते लोक उच्च स्थानावर सुरक्षित राहतील. उंच पर्वतांवरील दुर्ग त्यांचे रक्षण करतील. त्यांना नेहमीच अन्न व पाणी मिळेल.
येशूने उत्तर दिले, “असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल.”‘ अनुवाद 8:3
आम्हाला रोज लागणारी भाकर आज आम्हांला दे,
अरण्यात आमच्या पूर्वजांनी देवाने दिलेला मान्ना खाल्ला. पावित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, देवाने त्यांना स्वर्गातील भाकर खायाला दिली.”
आम्ही अशा लोकांना आज्ञा करतो व प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बोध करतो की, त्यांनी शांतीने काम करावे आणि स्वत:ची भाकर स्वत:च मिळवून खावी.
जर आपणांस अन्र, वस्र (आसरा) असेल तर त्यामध्ये आपण संतुष्ट असावे.