आणि त्याला म्हटले, “जर तू देवाचा पूत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे की,‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय खडकावर आपटू नयेत म्हणून ते तुला हातांवर झेलतील.”‘ स्तोत्र 91:11-12
Cross references
तू नेहमी त्याचे, त्याच्या कुटुंबाचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतोस. तो जे जे काही करतो त्यांत तू त्याला यशस्वी करतोस. तू त्याला आशीर्वाद दिला आहेस. तो इतका श्रीमंत आहे की सर्व देशभर त्याचे पशुधन पसरलेले आहे.
तू देवाशी करार केला आहेस तेव्हा मैदानातले खडकही तुझ्या या करारात सहभागी आहेत. रानटी पशूही तुझ्याशी सलोखा करतील.
परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.
परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांचे एकही हाड तो मोडू देणार नाही.
देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील.
येशूने उत्तर दिले, “असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल.”‘ अनुवाद 8:3
नंतर त्याने त्याला यरुशलेमाला नेले. आणि मंदिराच्या उंच टोकावर त्याला उभे केले. आणि तो म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार!
आणि यात आश्चर्य नाही, कारण सैतानदेखील प्रकाशाच्या दूताचे रुप धारण करतो.
सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठविले जातात की नाही?