Home Bibles मत्तय 4:12 · मराठी बायबल
मत्तय 4:12 · मराठी बायबल

नंतर योहानाला तुरूंगात टाकले आहे हे ऐकून येशू गालीलास परतला.

Cross references

मत्तय 14:3

हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानला अटक करून तुरूंगात टाकले होते.

मार्क 1:14

यानंतर, योहानाला तुरुंगात टाकण्यात आले. येशू गालीलास गेला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने सांगितली.

मार्क 6:17

कारण हेरोदाने स्वत: योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती. त्याचा भाऊ फिलिप याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले. त्या कारणामुळे त्याने असे केले.

लूक 3:20

हे सर्व करुन सुद्धा त्यात भर म्हणून की काय त्याने योहानाला तुरुंगात टाकले.

लूक 4:14

मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालीलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली.

लूक 4:31

नंतर तो गालीलातील कफर्णहूम गावी गेला. तो त्यांना शब्बाथ दिवशी शिक्षण देत असे.

योहान 3:24

(योहान तुरुंगात जाण्याच्या अगोदर हे घडले.)

योहान 4:43

दोन दिवसांनी येशू तेथून निघाला आणि गालील प्रांतात गेला.

योहान 4:54

यहुदीयातून गालील प्रांतात आल्यानंतर येशूने केलेला हा दुसरा चमत्कार.

Interlinear

Choose Theme