Home Bibles मत्तय 26:50 · मराठी बायबल
मत्तय 26:50 · मराठी बायबल

येशू त्याला म्हणाला, “मित्रा, जे करण्यास आलास ते कर!” मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्याला धरले.

Cross references

2 शमुवेल 16:17

अबशालोम त्याला म्हणाला, “तू आपल्या मित्राची, दावीदाची साथ का सोडलीस? तुही त्याच्याबरोबर यरुशलेम का सोडले नाहीस?”

स्तोत्रसंहिता 41:9

माझा सगळ्यात चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरुध्द गेला आहे.

स्तोत्रसंहिता 55:13

परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस माझा मित्र, माझा साथी, माझा दोस्त.

मत्तय 20:13

परंतु मळ्याचा मालक त्यांच्यातील एकाला म्हाणाला, मित्रा मी तुझ्याबाबतीत अन्याय करीत नाही. आपण यावर सहमत झालो नाही का की, मी तुला एक चांदीचे नाणे मजुरी देईन?

मत्तय 22:12

राजा त्याला म्हणला, ‘मित्रा, तुला तेथे कोणी व कसे येऊ दिले? मेजवानीला साजेसे कपडे नसताना तू येथे कसा आलास?’ पण तो गप्प राहिला.

लूक 22:48

परंतु येशू त्यास म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा तू विश्वासघात करतोस काय?”

Interlinear

Choose Theme