Home Bibles मत्तय 23:4 · मराठी बायबल
मत्तय 23:4 · मराठी बायबल

वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व ते ओझे लोकांच्या खांद्यांवर देतात व ते स्वत: ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत.

Cross references

मत्तय 11:28

जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हांला विश्रांति देईन.

मत्तय 23:23

परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता- पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दंशाश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे- न्यायाने वागणे, दया दाखविणे व प्रामाणिकपणे वागणे हे तुम्ही पाळत नाही. या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत व तसेच इतरही केल्या पाहिजेत.

लूक 11:46

तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 15:10

मग आता यहूदीतर लोकांच्या मानेवर जड जू तुम्ही का ठेवीत आहात? तुम्ही देवाला राग आणीत आहात काय? आपण व आपले वाडवडील (पूर्वज) हे ओझे वाहण्याइतके सशक्त नव्हतो.

प्रेषितांचीं कृत्यें 15:28

पवित्र आत्म्याला असे वाटते की, तुमच्यावर आता आधिक ओझे असू नये. आणि आम्हांला ते मान्य आहे. तुम्ही फक्त पुढील गोष्टी कराव्यात:

गलतीकरांस 6:13

परंतु सुंता करुन घेणारेही नियमशास्त्रपाळीत नाहीत आणि तरीही तुमची सुंता व्हावी असे त्यांना वाटते. यासाठी की, त्यांना तुमच्या देहावरुन फुशारकी मारतायावी.

प्रकटीकरण 2:24

“पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आजरीत नाहीत त्यांना मी सांगतो की, ज्यातुम्ही सैतानाची म्हणाविलेली खोल गुपिते जाणली नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही.

Interlinear

Choose Theme