Home Bibles मत्तय 22:34 · मराठी बायबल
मत्तय 22:34 · मराठी बायबल

येशूने सदूकी लोकांना अशा बोधकथा सांगितल्या की त्यांना वाद घलता येईना. हे परूश्यांनी ऐकले. म्हणून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली.

Cross references

यशया 41:5

अती दूरच्या सर्व स्थळांनो, पाहा आणि भिऊन असा! पृथ्वीवरच्या दूरवरच्या सर्व ठिकाणांनो, भीतीने थरथर कापा! इकडे या आणि माझे ऐका.” आणि ते आले.

मत्तय 12:14

नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्याला कसे मारावे याविषयी मसलत केली.

मार्क 12:28

त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घातलाना ऐकले. येशूने त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले. तेव्हा त्याने विचारले, “सर्व आज्ञांत महत्त्वची पाहिली आज्ञा कोणती?”

योहान 11:47

तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले, हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 5:24

मंदिराच्या पहारेकऱ्यांच्या सरदाराने आणि प्रमुख याजकाने हे शब्द ऐकले. ते गोंधळात पडले, व यानंतर काय होईल याबद्दल बुचकळ्यात पडले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:23

याकाळामध्येत्यामार्गाविषयी (ख्रिस्ती चळवळीविषयी) मोठा गोंधळ उडला.

प्रेषितांचीं कृत्यें 21:28

ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “इस्राएलच्या लोकांनो, मदत करा! हाच तो मनुष्य आहे, जो सर्व लोकांना सगळीकडे आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या जागेबद्दल शिकवीत आहे, आणि आता त्याने विदेशी लोकांना देखील मंदिरात आणले आहे, आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.”

Interlinear

Choose Theme