Home Bibles ☰ Books मत्तय 19:5 · मराठी बायबल
मत्तय 19:5 · मराठी बायबल

आणि देव म्हाणाला, म्हणून पुरूष आपल्या आईवडिलांना सोडिल व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.

Cross references

उत्पत्ति 2:21

तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती मांसाने भरुन आली.

उत्पत्ति 34:3

शखेमाचे दीनावर प्रेम जडले आणि तिने त्याच्याशी लग्न करावे म्हणून त्याने तिची मनधरणी केली.

अनुवाद 4:4

पण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलेले तुम्ही आज जिवंत आहा.

अनुवाद 10:20

तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचीच सेवा करा. त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्याला धरुन राहा. शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या.

अनुवाद 11:22

“मी सांगतो त्या सर्व आज्ञा नीट पाळा. परमेश्वर तुमचा देव ह्याजवर प्रेम करा. त्याने सांगितलेल्या मार्गाने जा. त्याच्यावरच निष्ठा ठेवा.

1 शमुवेल 18:1

शौलशी चाललेले दावीदचे बोलणे झाल्यावर योनाथान मनाने दावीदाच्या निकट आला. दावीदवर तो स्वत:इतकेच प्रेम करु लागला.

1 शमुवेल 25:43

इज्रेल येथील अहीनवाम ही सुध्दा दावीदची बायको होती. तेव्हा अबीगईल आणि अहीनवाम अशा त्याच्या दोन बायका झाल्या.

2 शमुवेल 1:26

बंधो. योनाथान, मी अतिशय दु:खी असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे. तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला. स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते

1 राजे 11:2

परमेश्वराने पूर्वीच इस्राएल लोकांना सांगितले होते “परक्या देशातील लोकांशी विवाह संबंध ठेवू नका. तसे केलेत तर ते तुम्हाला त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील.” असे असूनही शलमोन या बायकांच्या प्रेमात पडला.

स्तोत्रसंहिता 45:10

मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल. तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.

स्तोत्रसंहिता 63:8

माझा आत्मा तुला धरुन ठेवतो आणि तू माझा हात धरतोस.

मार्क 10:5

येशू म्हणाला, “कारणकेवळ तुमच्या हट्टामुळे मोशेने तुमच्यासाठी ही पर्यायी अनुमति दिली (लिहिली) आहे.

Interlinear

Choose Theme