Home Bibles मत्तय 19:10 · मराठी बायबल
मत्तय 19:10 · मराठी बायबल

मग त्याचे शिष्य त्याला म्हणाले, जर पती व पत्नीमधील परिस्थिति अशी असेल तर मग लग्न न करणे जास्त योग्य ठरेल.”

Cross references

उत्पत्ति 2:18

नंतर परमेश्वर बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करीन.”

नीतिसूत्रे 5:15

तुझ्या विहिरीतून वाहणारे पाणीच फक्त पी. आणि तुझे पाणी रस्त्यावर वाहून जाऊ देऊ नकोस. तू फक्त तुझ्या बायको बरोबरच लैगिक संबंध ठेवायला हवेस. तुझ्या घराबाहेरच्या मुलांचा बाप होऊ नकोस.

नीतिसूत्रे 18:22

जर तुम्हाला बायको मिळाली, तर तुम्हाला चांगली गोष्ट मिळाली असे होईल. परमेवर तुमच्यावर खुश आहे असे ते दर्शवते.

नीतिसूत्रे 19:13

मूर्ख मुलगा त्याच्या वडिलांचा सर्वनाश करु शकतो आणि वाद घालणारी बायको सतत टपटप पडणाऱ्या पाण्यासारखी चीड आणणारी असते.

नीतिसूत्रे 21:9

सतत वाद घालणाऱ्या बायकोबरोबर घरात राहाण्यापेक्षा घराच्या छतावर राहाणे अधिक चांगले.

नीतिसूत्रे 21:19

वाद घालणाऱ्या रागीट बायकोबरोबर राहाण्यापेक्षा वाळवंटात राहाणे अधिक चांगले.

1 करिंथकरांस 7:1

आता, तुम्ही ज्याविषयी आपणा त्यासंबंधाने: एखाद्या मनुष्याने एखाद्या स्त्रीला स्पर्श न करणे हे त्याच्यासाठी चांगले आहे,

1 करिंथकरांस 7:8

परंतु जे अविवाहित व विधवा आहेत त्यांना मी म्हणून की, म्हपासारखीचराहिली तर त त्यांना बरे.

1 करिंथकरांस 7:26

मी हे असे समजतो: सध्याच्या दुर्दशेत हे चांगले आहे, (होय) हे चांगले आहे की, एखाद्याने माइयासारखे एकटे राहावे.

1 करिंथकरांस 7:32

माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही काळजीपसून मुक्त असावे. अविवाहित पुरुष प्रभूच्या कामाविषयी आणि त्याला कसे संतोषविता येईल याबाबत काळजीत असतो.

1 करिंथकरांस 7:39

पति जिवंत आहे तोपर्यंत स्त्री लग्नाने बांधलेली आहे, पण तिचा पति मेला तर तिला पाहिजे त्याच्याशी परंतु केवळ प्रभूमध्ये लग्न करण्यास ती मोकळी आहे.

1 तीमथ्याला 4:3

ते लोकांना लग्न करण्यास मना करतात व काही अन्रपदार्थ टाळण्यासाठी सांगतात. जे विश्वासणारे आहेत, व ज्यांना सत्य माहीत आहे अशांनी उपकार मानून घेण्यासाठी देवाने ते निर्माण केले आहेत.

1 तीमथ्याला 5:11

पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे. कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात, तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते.

Interlinear

Choose Theme