Home Bibles ☰ Books मत्तय 18:16 · मराठी बायबल
मत्तय 18:16 · मराठी बायबल

पण जर तो किंवा ती तुझे एकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील,

Cross references

गणना 35:30

“मारणाऱ्याला मरणाची शिक्षा जर साक्षीदार असेल तरच दिली जाईल. जर एकच साक्षीदार असेल तर कोणालाही मरणाची शिक्षा दिली जाणार नाही.

अनुवाद 17:6

त्या व्यक्तिच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका.

अनुवाद 19:15

तो तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका.

1 राजे 21:13

मग, नाबोथ देवाविरुध्द आणि राजाविरुध्द बोलल्याचे आपण ऐकले आहे असे दोन माणसांनी सांगितले. तेव्हा लोकांनी नाबोथला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला.

योहान 8:17

तुमचे स्वत:चेच नियमशास्त्र असे म्हणते की, दोन साक्षीदार एकाच गोष्टीविषयी साक्ष देतात तेव्हा ते काय म्हणतात, ते तुम्हांला स्वीकारावेच लागते.

2 करिंथकरांस 13:1

ही माझी तुम्हांला भेटण्याची तिसरी वेळ आहे. ‘प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीने सिद्ध करावी.’

1 तीमथ्याला 5:19

दोन किंवा तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय वडिलावरील आरोप दाखल करु नकोस.

इब्री लोकांस 10:28

जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्याला दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मारतात.

1 योहान 5:7

साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेत:

प्रकटीकरण 11:3

आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना सामर्थ्य देईन.ते देवाचा संदेश 1,260 दिवस देतील. ते तागाची वस्त्रेघालतील.”

Interlinear

Choose Theme