Home Bibles मत्तय 13:46 · मराठी बायबल
मत्तय 13:46 · मराठी बायबल

एक दिवस त्याला एक अत्यंत सुंदर मोती सापडतो. तेव्हा तो जाऊन आपले सर्वकाही विकतो आणि ते मोती विकत घेतो.

Cross references

नीतिसूत्रे 2:4

ज्ञानाचा चांदीसारखा शोध घे. गुप्तधनाप्रमाणे त्याचा शोध घे.

यशया 33:6

यरूशलेमा तू श्रीमंत आहेस. देवाच्या शहाणपणात व ज्ञानात तू श्रीमंत आहेत. तू तारणात श्रीमंत आहेस. तू परमेश्वराचा आदर करतो व तेच तुला श्रीमंत करते. म्हणून लक्षात असू दे की तू सतत राहाशील.

मत्तय 13:44

“स्वर्गाचे राज्य हे जणू काय शेतामध्ये लपवून ठेवलेल्या ठेवीसारखे आहे. एके दिवशी एका मनुष्याला ती ठेव सापडली. त्यामुळे त्या मनुष्याला खूप आनंद झाला. तो ती गुप्त ठेव पुन्हा त्याचा शेतात लपवून ठेवतो व आपले सर्व काही विकून ते शेत विकत घेतो.

मार्क 10:28

पेत्र त्याला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व सोडले आणि आपल्या मागे आलो आहोत.”

लूक 18:28

मग पेत्र म्हणाला, “पाहा, आमच्याकडे जे होते, ते सर्व सोडून आम्ही तुमच्यामागे आलो आहोत.”

प्रेषितांचीं कृत्यें 20:24

मी माइया जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभु येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे - ते काम म्हणजे- देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.

1 करिंथकरांस 3:21

म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारु नये. कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत.

गलतीकरांस 6:14

आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय मी कशाचाही अभिमान बाळगू नये. त्याच्या द्वारे मला जगवधस्तंभावर खिळलेले, व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे.

इफिसकरांस 3:8

जरी मी देवाच्या सर्व लोकांमध्ये लहानातील लहान आहे तरी मला हे देवाच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता यहूदीतरांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,

कलस्सैकरांस 2:3

ज्यामध्ये ज्ञानाची आणि शहाणपणाची सर्व संपत्ती लपलेली आहे.

1 योहान 5:11

आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की, देवाने आपल्याला अनंतकाळचे जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्यापुत्रामध्ये आहे.

प्रकटीकरण 21:21

बारा वेशी बारा मोत्यांनीबनविल्या होत्या. आणि प्रत्येक वेस एकाएका रत्नाची होती. नगरातील रस्ता शुद्ध सोन्याचा, काचेसारखा स्पष्ट होता.

Interlinear

Choose Theme