Home Bibles मत्तय 11:23 · मराठी बायबल
मत्तय 11:23 · मराठी बायबल

आणि तु कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते शहर आतापर्यत टिकले असते.

Cross references

उत्पत्ति 13:13

सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट व वाईट असल्याचे परमेश्वराला माहित होते.

उत्पत्ति 19:24

आणि परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांचा नाश करायला सुरुवात केली; त्याने आकाशातून त्या नगरावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव केला;

यशया 14:13

तू नेहमीच स्वत:ला सांगायचास, “मी परात्पर देवासारखा होईन. मी आकाशात उंच जाईन. देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन स्थापन करीन. मी पवित्र साफोन डोंगरवरच्या देवसभेत बसून देवांना भेटीन.

विलापगीत 2:1

परमेश्वराने सियोनकन्येला कसे अभ्राच्छादित केले आहे पाहा! त्याने इस्राएलचे वौभन धुळीला मिळविले .कोपाच्या दिवशी, इस्राएल आपले पायाखालचे आसन आहे. ह्याची परमेश्वराने आठवण ठेवली नाही.

यहेज्केल 16:48

मी परमेश्वर व प्रभू आहे. मी जिवंत आहे. माझ्या प्रतिज्ञेवर सांगतो की सदोम व तिच्या मुलींनी, तुझ्याइतकी व तुझ्या मुलींइतकी दुष्कृत्ये कधीच केली नाहीत.”

यहेज्केल 28:12

“मानवपुत्रा, सोरच्या राजाविषयीचे पुढील शोकगीत गा. त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो“‘तू एक आदर्श माणूस होतास. तू ज्ञानी होतास. तू अतिशय देखणा होतास.

यहेज्केल 31:16

मी वृक्ष पाडला. त्याच्या आवाजाने राष्ट्र हादरली, घाबरली. मी वृक्षाला मृत्यूलोकांत जायला भाग पाडले. तो वृक्ष इतर लोकांबरोबर खोल विवरात जाऊन पडला. पूर्वी, एदेनमधल्या सर्व वृक्षांनी आणि लबानोनमधील उत्तम झाडांनी तेच पाणी प्यायले होते. धरणीखाली गेलेले ते वृक्ष मग समाधान पावले.

ओबद्या 1:4

परमेश्वर, देव, असे म्हणतो, “जरी तू गरुडाप्रमाणे वर जातोस, आणि ताऱ्यांमध्यो घरटे बांधतोस, तरी मी तुला खाली आणील.”

मत्तय 4:13

परंतू तो नासरेथ येथे राहिला नाही, तर गालील सरोवराजवळील कफर्णहूम नगरात जाऊन राहिला. जबुलून व नफताली ह्या प्रदेशांना लागुनच कफर्णहूम नगर आहे.

मत्तय 8:5

येशू कफर्णहूम शहरास गेला. जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला, तेव्हा एक सेनाधिकारी त्याच्याकडे आला

मत्तय 16:18

आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. आणि मृत्युलोकाचा यावर अधिकार चालणार नाही.

मत्तय 17:24

येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास आले तेव्हा मंदिराचा कर वसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरू कराचा रूपया देत नाही काय?”

लूक 4:23

तो त्यांना म्हणाला, “अर्थात, तुम्ही मला ही म्हण लागू कराल; ‘वैद्या, स्वत:ला बरे कर.’ कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वत:च्या गावातसुद्धा कर.” मग तो म्हणाला,

लूक 14:11

कारण जो कोणी स्वत:ला उच्च करितो त्याला लीन केले जाईल व जो स्वत:ला लीन करील त्याला उच्च केले जाईल.”

लूक 16:23

आणि अधोलोकात. जेथे तो (श्रीमंत मनुष्य) यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले, व दूरवर असलेल्या अब्राहामाला पाहिले आणि लाजाराला त्याच्या शेजारी पाहिले,

योहान 4:46

येशू पुन्हा गालीलातील काना गावाला भेट देण्यास गेला. काना गावीच येशूने पाण्याचे द्राक्षारसात रुपांतर केले होते. तेथे राजाचे जे मुख्य आधिकारी होते त्यापैकी एक आधिकारी कफर्णहूम नगरात राहत होता, या माणसाचा मुलगा आजारी होता.

प्रेषितांचीं कृत्यें 2:27

कारण तू माझा जीव मरणाच्या जागेतराहू देणार नाहीस तू तुइया पवित्र लोकांच्या शरीराला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.

2 पेत्र 2:4

कराण देवाने, ज्या देवदूतांनी पाप केले त्यांनादेखील सोडले नाही, तर न्यायाचा दिवस येईपर्यंत त्यांना अधोलोकाच्या गडदअंधारात टाकले.

यहूदा 1:7

त्याचप्रमाणे, या देवदूतांसारखीच सदोम व गमोरा आणि त्या शहराच्याआसपासच्या नगरांनी लैंगिक अनीतीचे आचरण केले आणि अस्वभाविक लैंगिक संबधाच्या मागे ती लागली. अनंतकाळच्याअग्निच्या शिक्षेसाठी ती राखून ठेवली आहेत. एक उदाहरण म्हणून ती आपल्यासमोर ठेवली आहेत.

प्रकटीकरण 11:8

त्या साक्षीदारांची शरीरे मोठ्या शहराच्या रस्त्यावर पडतील.त्या शहरांचे नाव सदोम आणि इजिप्त असे आहे. शहरांच्या या नावांना विशेष अर्थ आहे. या शहरातच आपल्या प्रभूलावधस्तंभावर मारण्यात आले.

Interlinear

Choose Theme