याप्रमाणे अब्राहामापासून दाविदापर्यत चौदा पिढ्या झाल्या आणि दाविदापासून बाबेलच्या बंदीवासापर्यंत चौदा पिढ्या झाल्या. बाबेलच्या बंदिवासापासून ख्रिस्ताच्या जन्मापर्यत चौदा पिढ्या झाल्या.(लूका2.1-7)
Cross references
नबुखद्नेस्सरने यरुशलेममधली सगळी वडीलधारी मंडळी आणि धनवान लोक यांना कैद केले. दहाहजार लोकांना त्याने कैद केले. कुशल कामगार आणि कारागिर यांनाही त्याने पकडले. अगदी गरीबातला गरीब माणूस वगळता कोणालाही मोकळे ठेवले नाही.
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने ह्या गोष्टीयरुशलेममध्येच सोडून दिल्या. त्याने यहूदाचा राजा यकन्या ह्याला कैद करुन नेले, तेव्हा ह्या गोष्टी नेल्या नाहीत. यकन्या हा यहोयाकीम राजाचा मुलगा होता. नबुखद्नेस्सरने यहूदातील व यरुशलेममधील इतर महत्वाच्या व्यक्तींनासुद्धा नेले.
योशीया यखन्या व त्याचे भाऊ यांचा पिता होता. (जेव्हा यहूदी लोकांना गुलाम म्हणून बाबेलास नेण्यात आले तेव्हा हे झाले.)
बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या गोष्टीविषयी ऐकले. तेव्हा योहानाने काही शिष्यांना येशूकडे पाठविले.
अंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की, आपला भाऊ शिमोन याला शोधून काढले. अंद्रिया शिमोनाला म्हणाला, “आम्हांला मशीहा सापडला आहे.”