Home Bibles मार्क 9:4 · मराठी बायबल
मार्क 9:4 · मराठी बायबल

एलीया व मोशे त्याच्याबरोबर प्रगट झाले, ते येशूबरोबर संभाषण करीत होते.

Cross references

अनुवाद 34:5

मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्याला सांगितले होतेच.

2 राजे 2:11

एलीया आणि अलीशा बोलत बोलत पुढे चालले होते. तेवढयात अचानक काही घोडे आणि एक रथ तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी एलीया आणि अलीशाला एकमेकांपासून दूर केले. तो रथ आणि घोडे अग्नीप्रमाणे होते नंतर एका वावटळीमधून एलीया स्वर्गात गेला.

मत्तय 11:13

कारण योहानापर्यत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी संदेश दिले.

मत्तय 17:3

तेव्हा मोशे व एलीया हे त्याच्याशी संभाषण करीत असलेले त्यांना दिसले.

लूक 9:19

ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणारा योहान, इतर काही एलीया आणि काहीजण म्हणतात की, फार पूर्वी होऊन गेलेल्या संदेष्ट्यांपैकी कोणी तरी उठला आहे.”

लूक 9:30

आणि तेथे दोघे जण त्याच्याबरोबर बोलत होते. ते एलीया व मोशे होते. ते गौरवामध्ये प्रगट झाले होते,

लूक 24:27

आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करुन आणि सर्व संदेष्ट्यापर्यंत सांगून, पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करुन सांगितले.

लूक 24:44

तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”

योहान 5:39

तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता. त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला अनंतकाळचे जीवन मिळते, असे तुम्हांला वाटते, तेच शास्त्र माझ्याविषयी सांगते!

योहान 5:45

मी पित्यासमोर उभा राहून तुम्हांला दोषी ठरवीन असे समजू नका. तुमजे चुकते असे मोशेच तुम्हांला म्हणतो, आणि मोशे आपले तारण करील अशी तुम्हांला आशा आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 3:21

परंतु देवाने त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांच्या तोंडून ज्या गोष्टी आरंभापासूनच सांगितल्या त्या घडून येईपर्यंत त्याला स्वर्गातच राहिले पाहिजे.

1 पेत्र 1:10

तुमच्याकडे येणार असलेल्या कृपेसंबंधी ज्या संदेष्ट्यांनी भविष्य वर्तविले होते त्यांनी त्या तारणाबाबत फार मन:पूर्वक शोध घेतला व काळजीपूर्वक चौकशी केली.

प्रकटीकरण 19:10

यावर मी देवदूताच्या पायावर डोके ठेवून त्याची उपासना करु लागलो; परंतु देवदूत म्हणाला, “असे करु नको, मी तरतुझ्याबरोबरीचा आणि येशूच्या सत्याबाबत साक्ष देण्याची जबाबदारी तुझ्या ज्या भावांवर आहे, त्यांच्या बरोबरीचा एक सेवकमात्र आहे. देवाची उपासना कर! येशूच्या सत्याचे शिक्षण देणे हाच देवाच्या संदेशाचा आत्मा आहे.”

Interlinear

Choose Theme