Home Bibles मार्क 9:19 · मराठी बायबल
मार्क 9:19 · मराठी बायबल

येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही लोक विश्वास ठेवीत नाही. मी तुमचे कोठवर सहन करू? मुलाला इकडे आणा.”

Cross references

गणना 14:11

परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक किती वेळ माझ्याविरुद्ध जाणार आहेत? त्यांचा माझ्यावर विश्वास नाही असे ते दाखवितात ते माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला नकार देतात. मी त्यांना खूप शक्तिशाली चिन्हे दाखवली तरीही ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मी त्यांच्या मध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या आहेत.

गणना 14:22

मी मिसर देशातून ज्या लोकांना बाहेर काढले त्यांच्यापैकी कोणीही कनान देश कधीही बघणार नाही. त्या लोकांनी मिसर देशात माझा पराक्रम आणि मी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या. आणि वाळवंटात ज्या महान गोष्टी मी केल्या त्याही त्यांनी बघितल्या. परंतु त्यांनी माझी आज्ञा पाळली नाही आणि माझी दहादा परीक्षा पाहिली.

गणना 14:27

“हे वाईट लोक किती काळ माझ्याविरुद्ध तक्रार करीत राहणार आहेत? मी त्यांच्या तक्रारी आणि कुरकुरी ऐकलेल्या आहेत.

गणना 32:13

“परमेश्वर इस्राएल लोकांवर खूप रागावला होता. म्हणून परमेशवराने त्यांना 40 वर्षे वाळवंटात ठेवले. ज्या लोकांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले त्या लोकांना परमेश्वराने मरण येईपर्यंत तिथे ठेवले.

अनुवाद 32:20

तो म्हणाला, ‘मी आता त्यांच्यापासून तोंड फिरवतो. त्यांचा शेवट कसा होणार आहे ते मला माहीत आहे. ही माणसे बंडखोर आहेत. अभ्यास न करणाऱ्या मुलांप्रमाणे आहेत.

स्तोत्रसंहिता 78:6

नवीन मुले जन्माला येतील, तीच पुढे मोठी होतील आणि ती त्यांच्या मुलांना गोष्टी सांगतील या प्रमाणे लोकांना अगदी शेवटच्या पिढीपर्यंत नियम समजेल.

स्तोत्रसंहिता 78:22

का? कारण लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. देव त्यांना वाचवील यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.

स्तोत्रसंहिता 106:21

देवाने आमच्या पूर्वजांना वाचवले. पण ते मात्र त्याला पूर्णपणे विसरले. ज्या देवाने मिसरमध्ये चमत्कार केलेत्या देवाला ते विसरले.

मत्तय 17:17

येशूने उत्तर दिले, “अहो अविश्वासूव विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्याला माझ्याकडे आणा.”

मार्क 16:14

नंतर अकरा जण जेवत बसले असता येशू त्यांना प्रगट झाला. त्याने शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंत:करणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली. कारण ज्यांनी त्याला उठल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.

लूक 9:41

“येशू म्हणाला अहो, अविश्वासू व चुकलेल्या लोकांनो! मी तुमच्याबरोबर किती काळ राहू व किती काळ तुमचे सोसू? त्या मुलाला इकडे आणा.”

लूक 24:25

मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.

योहान 12:27

“माझे अंत:करण व्याकूळ झाले आहे. आणि मी आता काय सांगू? “पित्या माझी या घटकेपासून सुटका कर? केवळ याच कारणासाठी या वेळेला मी आलो.

योहान 20:27

मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट इकडे कर व माझे हात पाहा आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास ठेव.”

इब्री लोकांस 3:10

त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि म्हणालो, ‘या लोकांच्या मनात नेहमी चुकीचे विचार येतात, या लोकांना माझे मार्ग कधीही समजले नाहीत’

Interlinear

Choose Theme