Home Bibles मार्क 9:17 · मराठी बायबल
मार्क 9:17 · मराठी बायबल

लोकांतील एकाने त्याला उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणकडे आणले. त्याला अशुद्ध आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही.

Cross references

मत्तय 12:22

मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला.

मत्तय 17:15

“प्रभु, माझ्या मुलावर दया करा. त्याला फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो.

मार्क 5:23

आणि आग्रहाने विनंति करून त्याला म्हणाला, “माझी लहान मुलगी मरावरायस टेकली आहे. मी विनंती करतो की आपण येऊन तिला बरे वाटावे म्हणून तिच्यावर हात ठेवावा.”

मार्क 7:26

ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली.

मार्क 9:25

येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावात येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे याला मुके बहिरे करणाऱ्या आत्म्या मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको.”

मार्क 10:13

त्याने त्यांना स्पर्श करावा, यासाठी लोक लहान बालकांना त्याच्याकडे आणीत होते. परंतु शिष्यांनी त्यांना दटावले

लूक 9:38

आणि त्याचवेळी जमावातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, “गुरुजी, मी तुम्हांला विनंति करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे.

लूक 11:14

येशू एक भूत काढीत होता. ते मुके होते. मग असे झाले की, जो मनुष्य बोलू शकत नव्हता तो, भूत बाहेर आल्यावर, बोलू लागला व लोकांचा जमाव चकित झाला.

योहान 4:47

येशू यहूदीयातून आला आहे आणि आता तो गालीलातच आहे हे त्या अधिकाऱ्याने ऐकले. म्हणून तो मनुष्य येशूकडे काना गावी गेला. येशूने कफर्णहूम तेथे येऊन आपल्या मुलाला बरे करावे म्हणून त्याने याचना केली. कारण त्याचा मुलगा जवळजवळ मेला होता.

Interlinear

Choose Theme