Home Bibles मार्क 6:7 · मराठी बायबल
मार्क 6:7 · मराठी बायबल

त्याने बारा शिष्यांना आपणांकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठविले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला.

Cross references

निर्गम 4:14

परमेश्वर मोशेवर रागावला! परमेश्वर म्हणाला, “मी तुला आणखी मदत देतो. लेवी कुटुंबातील तुझा भाऊ अहरोन याचा मी उपयोग करतो. तो पटाईत वक्ता आहे. तो अगोदरच तुझ्याकडे योण्यास निघाला आहे. तुला भेटल्यावर त्याला आनंद होईल.

उपदेशक 4:9

एकापेक्षा दोन माणसे बरी. दोन माणसे एकत्र काम करीत असली तर त्यांना त्यापासून अधिक मिळते.

मत्तय 10:1

येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले, आणि त्याने त्यांना भुते घालविण्याचा अधिकार दिला. तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला.

मत्तय 10:9

तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका.

मार्क 3:13

नंतर येशू डोंगरावर गेला आणि जे त्याला पाहिजे होते त्यांना त्याने स्वत:कडे बोलाविल. व ते त्याच्याकडे आले.

लूक 6:13

जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणांकडे बोलाविले. त्याने त्यांच्यातील बारा जणांना निवडले व त्यांना “प्रेषित” असे नाव दिले.

लूक 9:1

येशूने बारा शिष्यांना एकत्र बोलाविले, आणि त्याने त्यांना सर्व भुतांवर सामर्थ्य व अधिकार दिला. आणि त्यांना त्याने रोग बरे करण्याचे सामर्थ्य दिले.

लूक 10:1

या घटनांनंतर प्रभुने इतर बहात्तर जणांचीनेमणूक केली. आणि येशूने त्यांना जोडीजोडीने पाठविले. त्याला ज्या ठिकाणी जायचे होते त्या प्रत्येक गावात व ठिकाणी त्याने त्यांना पाठविले.

लूक 10:3

जा! आणि लक्षात ठेवा, लांडग्यात जशी कोंकरे तसे मी तुम्हास या जगात पाठवीत आहे.

लूक 10:17

ते बहात्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभु, तुझ्या नावाने भुतेसुद्धा आम्हांला वश होतात!”

प्रकटीकरण 11:3

आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना सामर्थ्य देईन.ते देवाचा संदेश 1,260 दिवस देतील. ते तागाची वस्त्रेघालतील.”

Interlinear

Choose Theme