मग येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?”तो मनुष्य येशूला म्हणाला, “माझे नाव सैन्यआहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत.”
Cross references
नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा वाईट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्याला झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या माणसाची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या ह्या पापी पिढीचे होईल.”
मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या बारापेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हांला कळत नाही काय?
ते येशूकडे आले आणि त्यांनी त्या भूतग्रस्ताला तेथे बसलेले पाहिले. त्याने कपडे घातले होते. तो शुद्धीवर आलेला व ज्याला सैन्य नावाच्या भुतांनी पछाडले होते तो तोच होता हे पाहिले तेव्हा त्यांना भीति वाटली.
येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?”तो म्हणाला, “सैन्य,” कारण त्याच्यात अनेक भुते शिरली होती.
जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो आणि स्वत:चे रक्षण करतो तेव्हा त्याची मालमता सुरक्षित राहते.