Home Bibles मार्क 5:33 · मराठी बायबल
मार्क 5:33 · मराठी बायबल

त्या स्त्रीला ती बरी झाली आहे हे माहीत होते म्हणून ती आली आणि येशूच्या पाया पडली. ती स्त्री भीतिने थरथर कांपत कोती. तिने य़ेशूला सर्व काही सांगितले.

Cross references

स्तोत्रसंहिता 30:2

परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला बरे केलेस.

स्तोत्रसंहिता 66:16

देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या. देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो.

स्तोत्रसंहिता 103:2

माझ्या आत्म्या, परमेश्वराचा जयजयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरु नकोस.

स्तोत्रसंहिता 116:12

मी परमेश्वराला काय देऊ शकतो? माझ्या जवळ जे आहे ते मला परमेश्वरानेच दिले आहे.

मार्क 4:41

परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, की वारा आणि समुद्रदेखील त्याचे ऐकतात.”

लूक 1:12

जेव्हा जखऱ्याने त्याला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला, आणि त्याला भीति वाटली.

लूक 1:29

परंतु या शब्दांनी ती अस्वस्थ झाली, आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करु लागली.

लूक 8:47

आपण येशूच्या नजरेतून सुटू शकणार नाही हे जेव्हा त्या स्त्रीने पाहिले तेव्हा ती थरथर कांपत आली आणि त्याच्या पाया पडली. तेथे तिने सर्व लोकांसमोर आपण त्याला का स्पर्श केला व आपण कसे बरे झालो ते सांगितले.

Interlinear

Choose Theme