मार्क 5:26 · मराठी बायबल
बऱ्याच वैद्यांकडून इलाज करून घेऊनसुद्धा तिने बराच त्रास सहन केला होता. तिच्याकडे होते नव्हते ते सर्व तिने उपचारासाठी खर्च केले होते. पण ती बरी न होता. तिचा आजार वाढला होता.
Cross references
ईयोब 13:4
तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवीत आहात. ज्या वैद्याला कुणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात.
स्तोत्रसंहिता 108:12
देवा, आम्हाला आमच्या सत्रूचा पराभव करायला मदत कर. लोक आम्हांला मदत करु शकत नाहीत.
यिर्मया 8:22
गिलादमध्ये नक्कीच काही औषध आहे. तेथे नक्कीच वैद्य आहे. मग माझ्या लोकांच्या जखमा का भरुन येत नाहीत?
यिर्मया 30:12
परमेश्वर म्हणतो, “इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, तुम्हाला कधीही बरी न होणारी जखम झाली आहे, कधीही भरुन न येणारी हानी पोहोचली आहे.
यिर्मया 51:8
पण बाबेलचे अकस्मात पतन होईल आणि त्याची शकले पडतील. तिच्यासाठी शोक करा. तिच्या दु:खावर इलाज करा. कदाचित् तिच्या जखमा भरुन येतील.