मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्याला पेत्र हे नाव दिले.
Cross references
बारा प्रेषितांची नावे अशी आहेत. पेत्र (ज्याला शिमोन म्हणत) आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान,
शिमोनाने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
येशू गालीलाच्या सरोवराजवळून जात होता तेव्हा त्याने शिमोनव शिमोनाचा भाऊ अंद्रिया याला सरोवरात जाळे टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते.
शिमोनत्याला पेत्र हे सुद्धा नाव दिले, आंद्रिया (पेत्राचा भाऊ), याकोब आणि योहान, फिलिप्प, बर्थलमय,
शिमोनाला घेऊन अंद्रिया येशूकडे आला. शिमोनाकडे पाहून येशू म्हणाला, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफाम्हणतील.”
प्रेषित शहरात परत आल्यावर ज्या ठिकाणी मुक्कामाला होते, त्या ठिकाणी गेले. ही माडीवरची खोली होती. त्या ठिकाणी हे प्रेषित होते: पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, याकोब (अल्फीचा पुत्र), शिमोन (झिलोटम्हणून माहित असलेला) आणि यहूदा (याकोबाचा पुत्र).
माझे म्हणणे असे आहे की तुमच्यातील प्रत्येक जण म्हणतो, “मी पौलाचा आहे.” “मी अपुल्लोचा आहे,” “मी पेत्राचा आहे,” “मी ख्रिस्ताचा आहे.”
तर तो पौल, अपुल्लोस, पेत्र, जग, जीवन किंवा मरण असो, वर्तमानकाळाच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळाच्या गोष्टी असोत, सर्व गोष्टी तुमच्या आहेत.
इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ आणि पेत्र यांच्यासारखे एखाद्या विश्वासणान्या व्यक्तीला पत्नी करुन घेण्याचा मला हक्क नाही काय?
उलट, जेव्हा ते म्हणतात की, विदेशी लोकांना सुवार्ता सांगण्याचेकार्य माझ्यावर सोपविण्यात आले आहे, ज्याप्रमाणे पेत्राला यहूदी लोकांना सुवार्ता सांगण्याचे कार्य सोपविलेले आहे.
ख्रिस्त येशूचा दास व प्रेषित असलेल्या शिमोन पेत्राकडून,देवाकडून, ज्यांना तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे, मौल्यावान विश्वास आमच्या बरोबरीनेच मिळाला आहे अशांना,