तसेच नवा द्राक्षारस कोणीही द्राक्षारसाच्या जुन्या कातडी पिशवीत घातील नाही. जर तो असे करतो तर द्राक्षारस कातडी पशवील फाडील आणि द्राक्षारस व द्राक्षारसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून तो नवा द्राक्षारस नव्या पिशवीत घालतो.”
Cross references
तेव्हा त्यांनी इस्राएलांना चकवण्याचा डाव आखला. त्यांची युक्ती अशी होती. प्रथम त्यांनी द्राक्षरसाचे जुने, झिजलेले. चामडी बुधलेघेतले आणि ते गाढवाच्या पाठीवर लादले. आपण फार दुरून आलो आहोत असे भासवायला जुनी गोणपाटेही गाढवांवर लादली.
“हे द्राक्षारसाचे बुधले पाहा. निघालो तेव्हा ते नवेकोरे आणि द्राक्षारसाचे बुधले पाहा. निघालो तेव्हा ते नवेकोरे आणि द्राक्षारसाने भरलेले होते. आता ते तडकलेले आणि जुने झाले आहेत. पाहा आमचे कपडे आणि जोडे एकढया लांबच्या प्रवासाने त्यांची कशी वाट लागली आहे.”
मी द्राक्षरसाच्या न फोडलेल्या बाटलीसारखा आहे. द्राक्षरसाच्या नव्या बुधल्याप्रमाणे मी फुटण्याच्या बेतात आहे.
परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञा पूर्णपणे पाळू दे म्हणजे मला लाज वाटणार नाही.
मी जरी उकिरड्यावरच्या द्राक्षारसाच्या बुधलीसारखा झालो असलो तरी मी तुझे नियम विसरणार नाही.
तसेच नवा द्राक्षारस जुन्या कातडी पिशवीत कोणी घालीत नाहीत, घातला तर पिशव्या फुटतात व त्यांचा नाश होतो. म्हाणून लोक नवा द्राक्षारस नव्या पिशव्यात घालतात. तेव्हा दोन्हीही चांगले राहतात.”
आणि कोणीही नवा द्राक्षारस जुन्या द्राक्षारसाच्या कातडी पिशवीत ठेवीत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षारस कातडी पिशवी फोडून बाहेर उसळेल.