Home Bibles मार्क 2:1 · मराठी बायबल
मार्क 2:1 · मराठी बायबल

नंतर काही दिवसांनी येशू कफर्णहूमास परत गेला. तो घरी आहे ही बातमी लोकांपर्यंत गेली.

Cross references

मत्तय 9:1

येशू नावेत चढला व परत आपल्या नगरात गेला.

मार्क 1:45

परंतु तो मनुष्य गेला व त्याने मोकळेपणाने सांगण्यास सुरुवात केली व ही बातमी पसरविली. याचा परिणाम असा झाला की, येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो एकांतवासात राहिला. आणि चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे आले.

मार्क 7:24

येशू त्या ठिकाणाहून निघाला आणि सोर प्रांताच्या आसपासच्या प्रदेशात गेला. तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. परंतु तो त्याची उपस्थिती लपवू शकला नाही. एका स्त्रीने ऐकले की येशू तेथे आहे. तिच्या मुलीला अशुद्ध आत्मा लागलेला होता.

लूक 5:18

काही लोक एका अर्धांगवायु झालेल्या मनुष्याला बिछान्यात घालून घेऊन आले. त्यांनी त्याला आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला.

लूक 18:35

येशू यरीहेजवळ येत असताना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता.

लूक 18:37

त्यांनी त्याला सांगितले की, “नासरेथकर येशू जात आहे.”

योहान 4:47

येशू यहूदीयातून आला आहे आणि आता तो गालीलातच आहे हे त्या अधिकाऱ्याने ऐकले. म्हणून तो मनुष्य येशूकडे काना गावी गेला. येशूने कफर्णहूम तेथे येऊन आपल्या मुलाला बरे करावे म्हणून त्याने याचना केली. कारण त्याचा मुलगा जवळजवळ मेला होता.

प्रेषितांचीं कृत्यें 2:6

या लोकांपैकी मोठा गट हा आवाज ऐकल्यामुळे तेथे आला.ते आश्चर्यचकित झाले कारण प्रेषित बोलत होते आणि प्रत्येक मनुष्याला त्याची स्वत:ची भाषा ऐकायला मिळाली,

Interlinear

Choose Theme