जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या अगोदर गालीलात जात आहे, त्यांने तुम्हांस सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हांस दृष्टीस पडेल.’
Cross references
पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालीलात जाईन,
आता ताबडतोब निघा आणि त्याच्या शिष्यांना सांगा : येशू मरणातून उठला आहे. तो गालीलात जाणार आहे. तो तुमच्या अगोदर तेथे जाईल, तुम्ही त्याला तेथे पाहाल.ʈनंतर देवदूत म्हणाला, ʇमी तुम्हांला सर्व काही सांगितले आहे.ʈ
मग येशू त्यांना म्हणाला, ʇमला अडवू नका. माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालीलात जावे. तेथेच त्यांची माझी भेट होईल.ʈ
अकरा शिष्य गालीलास निघून गेले. येशूने सांगितलेल्या डोंगरावर ते हजर झाले.
परंतु माझे पुनरूत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालीलात जाईन.”
सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
पेत्र अंगणात असतानाच मुख्य याजकांच्या दासींपैकी एक आली.
नंतर येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला. तो तिबीर्या सरोवराजवळ (जे गालीलात होते) त्या ठिकाणी दिसला. हे अशा प्रकारे घडले:
यानंतर, पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते, त्यांना गालीला पासून यरुशलेमपर्यंत येशूने दर्शन दिले. ते लोक आता त्याचे शाक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत.
व तो पेत्राला दिसला, नंतर बारा प्रेषितांना,
आता त्याऐवजी तुम्ही त्याला क्षमा केली पाहिजे आणि त्याचे सांत्वन केले पाहिजे. यासाठी की अति दु:खाने तो दबून जाऊ नये.