मार्क 16:2 · मराठी बायबल
आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या.
Cross references
दानीएल 6:19
दुसऱ्या दिवशी फटफटताच दारयावेश राजा उठला आणि त्याने सिंहाच्या गुहेकडे (पिंजऱ्याकडे) धाव घेतली.
मत्तय 28:1
शब्बाथवारानंतरचा पहिला दिवस आला. पहाटेस मरीया मग्दालिया, मरीया नावाची दुसरी स्त्री कबर पाहावयास तेथे गेल्या.
लूक 24:1
आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या, आणि त्यांनी स्वत: तयार केलेले मसाले आणले.
योहान 20:1
मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरीया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिला आढळले.