वल्हांडण सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत. त्याला पिलात रिवाजा प्रमाणे लोकांसाठी सोडत असे.
Cross references
“परवा वल्हांडणाचा सण आहे हे तुम्हांला माहीत आहे. आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जिवे मारला जाण्यासाठी शत्रूच्या हाती धरून दिला जाईल.”
तरीही ते म्हणत होते, “वल्हांडण सणाच्या दिवसात आपण येशूला धरू शकणार नाही, कारण लोकांमध्ये दंगा होईल.”
वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकसमुदायासाठी तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती.
म्हणून मी याला फटके मारुन सोडून देतो.
पण वल्हांडण सणात मी तुम्हांसाठीएकाला सोडावे अशी तुमच्यामध्ये रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?”
मग त्याने त्याला वधस्तंभी खिळण्यासाठी त्यांच्या हाती दिले.मग शिपायांनी येशूचा ताबा घेतला.
दोन वर्षे झाल्यावर फेलिक्सच्या जागी पुर्क्य फेस्त हा राज्यपाल झाला. आणि यहूदी लोकांचे मन मोडण्याची फेलिक्सची इच्छा नव्हती, म्हणून त्याने जाण्यापूर्वी पौलाला तुरुंगातच ठवले.
फेस्तला यहूदी लोकांना खूष करायचे होते म्हणून तो पौलाला म्हणाला, “यरुशलेम येथे जाऊन माइयासमोर तुझी चौकशी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय?”