मी तुम्हांला खरे सांगतो सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगतले जाईल.”
Cross references
मोशे आणि एलाजार यांनी हजार आणि शंभर सैनिकांवरच्या प्रमुखांकडून सोने घेतले. नंतर त्यांनी ते सोने दर्शन मंडपात ठेवले. ही भेट म्हणजे इस्राएल लोकांनी परमेश्वराला आठवणी खातर दिलेली भेट होती.
तो माणूस कधीही पडणार नाही. चांगला माणूस सदैव आठवणीत राहील.
“लोकांना आठवण राहावी म्हणून ते मुकुट मंदिरात ठेवतील. तो मुकुट हेल्दय, तोबीया, यदया व सफन्याचा मुलगा योशिया यांना राजाचे सामर्थ्य देवाकडून येते याची आठवण करुन देईल.
दानीएल संदेष्ट्यांने एका अमंगळ गोष्टीविषयी सांगितले की, जिच्यामुळे नाश ओढवेल. अशी अमंगळ गोष्ट ही पवित्र जागी- मंदिरामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.”
या बाईने माझ्या शरीरावर हे अत्तर ओतले. मला पुरण्याचा वेळेची तयारी तिने केली.
तो त्यांना म्हणाला, ‘संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.’