Home Bibles मार्क 14:70 · मराठी बायबल
मार्क 14:70 · मराठी बायबल

पेत्राने पुन्हा ते नाकारले. नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुद्धा गालीली आहेस.”

Cross references

शास्ते 12:6

मग ते त्याला “शिब्बोलेथ” हा शब्द उच्चारायला सांगत. एफ्राईम लोकांना तो नीट म्हणता येत नसे. तो म्हणे, “सिब्बोलेथ” तेव्हा हा माणूस एफ्राईम असलेयाचे त्यांच्या ध्यानात येई. नदीच्या उतारापाशी त्याला मारून टाकत. अशाप्रकारे त्यांनी बेचाळीस हजार एफ्राईम माणसे मारली.

मत्तय 26:73

काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्याला म्हणाले, “तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हांला माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हांला स्पष्ट दिसून येते.”

मार्क 14:68

परंतु पेत्राने ते नाकारले, आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला.

लूक 22:59

नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण ठामपणे म्हणाला, “खात्रीने हा मनुष्यसुद्धा त्याच्याबरोबर होता, कारण हा गालीलाचा आहे.”

योहान 18:26

मुख्य याजकाच्या नोकरांपैकी एकजण ज्याचा कान पेत्राने कापला होता त्याचा नातेवाईक होता. तो म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोब बागेत पाहिले नाही काय?”

प्रेषितांचीं कृत्यें 2:7

यामुळे यहूदी लोक अचंबित झाले. त्यांना हे समजत नव्हते की, प्रेषित हे कसे करु शकले. ते म्हणाले, “पाहा! ही माणसे (प्रेषित) ज्यांना आपण बोलताना ऐकत आहोत ती सर्व गालीलीआहेत!

Interlinear

Choose Theme