Home Bibles मार्क 14:31 · मराठी बायबल
मार्क 14:31 · मराठी बायबल

तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणांबरोबर मरावे लागले तरी सुद्धा मी आपणांला नाकारणार नाही.” आणि इतर सर्व जण तसेच म्हणाले.

Cross references

निर्गम 19:8

आणि सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले; ते म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेल्या सर्व आज्ञा आम्ही पाळू.”मग मोशे पुन्हा पर्वतावर देवाला भेटावयास गेला आणि लोक त्याच्या आज्ञा पाळतील असे त्याने देवाला सांगितले.

अनुवाद 5:27

तेव्हा मोशे, तूच आपला देव परमेश्वर ह्याच्या जवळ जाऊन त्याचे म्हणणे ऐकून घे. आणि मग ते आम्हाला सांग. आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे वागू.’

1 राजे 11:22

तेव्हा फारो त्याला म्हणाला, “येथे तुला हवे ते सर्व काही मी दिले आहे. असे असताना तू परत का जातोस?”तेव्हा हदादने पुन्हा जाऊ देण्याबद्दल विनंती केली.

2 राजे 8:13

हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र माणूस एक दुबळामाणूस या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!”अलीशा म्हणाल, “तू अरामचा राजा होणार असे परमेश्वराने मला वर्तवले आहे.”

ईयोब 40:4

“मी अगदी नगण्यआहे. मी काय बोलू? मी तुला उत्तर देऊ शकत नाही. मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो.

स्तोत्रसंहिता 30:6

मी जेव्हा सुरक्षित व निर्धास्त होतो तेव्हा मला कोणीच अपाय करणार नाही असे वाटले.

नीतिसूत्रे 16:18

जर माणूस गर्विष्ठ असला तर तो सर्वनाशाच्या संकटात असतो. जर एखादा माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करत असला तर तो पराभवाच्या संकटात असतो.

नीतिसूत्रे 18:24

काही मित्रांबरोबर असणे आनंददायी असते. पण जवळचा मित्र भावापेक्षाही चांगला असतो.

नीतिसूत्रे 29:23

माणसाचा गर्व त्याला खाली आणतो. जर एखाद्याला तो इतरापेक्षा चांगला आहे असे वाटत असेल तर त्यामुळे त्याचा नाश होईल. पण जर एखादा माणूस विनम्र असेल तर इतर लोक त्याचा आदर करतील.

यिर्मया 10:23

परमेश्वरा, माणसाच्या आयुष्यावर त्याचा स्वत:चा खरा हक्क नसतो, हे मला माहीत आहे. लोक भविष्याच्या योजना खरोखरच ठरवू शकत नाहीत.

यिर्मया 17:9

“माणसाचे मन फार कपटी असते. त्याच्यावर काही औषध नाही. म्हणूनच कोणालाही मनाचे खरे आकलन होत नाही.

मार्क 10:39

ते त्याला म्हणाले, “आम्हांस शक्य आहे.”मग येशू त्यांना म्हणाला, “मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल आणि जो बाप्तिस्मा घेईन तो तुम्ही घ्याल,

योहान 13:37

पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याने आताच तुमच्या मागे का येता येणार नाही?’ मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे.”

Interlinear

Choose Theme